डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेज अहिल्यानगर येथे पदवी प्रदान सोहळा
मालवण : मालवण चौके येथील डॉ. जाई स्मिता संजय पोळ यांना एमबीबीएस पदवी प्राप्त झाली आहे. डॉ. जाई यांचे शिक्षण रोजरी इंग्लिश स्कूल मालवण येथे झाले. नीट कोचिंग शाहू कॉलेज लातूर याठिकाणी करून त्यांनी एमबीबीएस चे शिक्षण डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेज, अहिल्यानगर येथे पुर्ण केले. डॉ. जाई स्मिता संजय पोळ यांना एमबीबीएस पदवी शिक्षण पुर्ण केले. नुकताच त्यांचा पदवी प्रदान सोहळा संपन्न झाला.

डॉ. जाई यांचे वडील डॉ. संजय पोळ हे ग्रामीण रुग्णालय मालवण, पेंडूर कट्टा येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. तर आई डॉ. स्मिता संजय पोळ या चौके येथे खासगी वैद्यकीय सेवा देतात. भाऊ डॉ. प्रणव पोळ हे एमडी पीएसएम असून वालावलकर कॉलेज, सावर्डे , रत्नागिरी येथे सेवा देत आहेत. तर वाहिनी डॉ. प्रिया प्रणव पोळ-जाधव या वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, चौके, मालवण येथे कार्यरत आहेत.

डॉ. जाई स्मिता संजय पोळ यांनी एमबीबीएस पदवी प्राप्त केल्या बद्दल त्यांचे सर्व स्तराहून, अभिनंदन होत आहे. यां सर्व प्रवासात सहकार्य व मार्गदर्शन केल्याबाबत सर्व हितचिंतक, सहकारी व मार्गदर्शक यांचे त्यांनी आभार व्यक्त केले आहेत.
▪️अमित खोत | मालवण

