Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

धुरीवाडा श्रीकृष्ण मंदिरातील मूर्तीला 'सुवर्ण मुकुट' अर्पण

धुरीवाडा श्रीकृष्ण मंदिरातील मूर्तीला 'सुवर्ण मुकुट' अर्पण

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते श्रीकृष्ण मूर्तीवर सुवर्ण मुकुट अर्पण

मालवण : मालवण शहर धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिरचा ७१ वा वर्धापन दिन तसेच मुर्ती पुनः प्रतिष्ठापना ४ वर्धापन दिन पाच दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांनी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिन सोहळा औचित्य साधून माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या वतीने नव्या झळाळीसह देण्यात आलेला सुवर्ण मुकुट मंगळवार ३१ मार्च रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते श्रीकृष्ण मूर्तीवर अर्पण करण्यात आला.

श्रीकृष्ण मंदिरात पूर्वी असलेल्या मूर्तीला खासदार नारायण राणे यांनी सुवर्ण मुकुट अर्पण केला होता. गेल्या काही वर्षात मंदिरात नव्या स्वरूपात मोठ्या श्रीकृष्ण मूर्तीची स्थापना करण्यात आली. त्यामुळे मूर्तीचा सुवर्ण मुकुट राणे साहेबांच्या प्रेरणेतुन मोठया स्वरूपात तयार करण्यात आला. खासदार नारायण राणे साहेब यांचा १० एप्रिल रोजी साजरा होणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्रीकृष्ण मूर्तीवर हा नवा मुकुट दत्ता सामंत यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला.

यावेळी मंदिर अध्यक्ष वसंत गांवकर, मुंबई अध्यक्ष अरुण कासवकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, अंकित नेरुरकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, मोहन वराडकर, नगरसेवक महेश कांदळगावकर, नगरसेवक ललित चव्हाण, राजू बिडये, महेश सारंग, भाऊ चव्हाण, किसन मांजरेकर, शेखर गाड, अखिलेश शिंदे, सुशील शेडगे, गणेश परब, भाई कासवकर यांसह आनंद जामसंडेकर, तुळशीदास गांवकर, किशोर वेंगुर्लेकर, दत्ता केळूसकर, बाबू धुरी, दिपक धुरी, गणपत तांडेल, शंकर शिर्सेकर, आबा शिर्सेकर, रवी कासवकर, नामदेव सारंग, शिवाजी केळूसकर यांसह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. श्रीकृष्ण मूर्तीची पूजा अभिषेक, धार्मिक कार्यक्रम, सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

▪️अमित खोत | मालवण

rapan bottom