भाऊ हडकर मित्रमंडळ पुरस्कृत या स्पर्धेचे श्री ब्राम्हणदेव मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजन
चिंदर : भाऊ हडकर मित्रमंडळ पुरस्कृत आणि श्री ब्राम्हणदेव मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजीत सडेवाडी प्रीमियर लीग 2025-26 क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ सोमवार 30 मार्च रोजी करण्यात आला.


तीन दिवस ही स्पर्धा चालणार असून विजेत्या संघाला भाऊ हडकर मित्रमंडळ पुरस्कृत 20 हजार रुपये व आकर्षक चषक, उपविजेत्या संघाला 10 हजार रुपये व आकर्षक चषक यांसह मालिकावीर याला सायकल तसेच सामनावीर व अन्य वैयक्तिक पारितोषिक आहेत.


