Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

ऑलिव्ह रिडले समुद्री कासवाची घोस्ट नेट मधून सुखरुप सुटका...

ऑलिव्ह रिडले समुद्री कासवाची घोस्ट नेट मधून सुखरुप सुटका...

समुद्री जीव संपत्तीला 'घोस्ट नेट'चा मोठा धोका…

वेंगुर्ला निवती लाईट हाऊस जवळ श्रीकृष्ण बोटिंग ग्रुप, देवबाग चे बोट मास्टर किशोर राऊळ यांनी केली सुटका.

मालवण |प्रतिनिधी : वेंगुर्ला निवती लाईट हाऊस जवळ पर्यटक समुद्र सफारीला गेले असता पाण्याच्या पृष्ठभागावर एक समुद्री कासव हे घोस्ट नेट मध्ये अडकलेल्या अवस्थेत श्रीकृष्ण बोटिंग ग्रुप, देवबाग चे बोट मास्टर किशोर राऊळ यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लगेच योग्य ती काळजी घेत त्या ऑलिव्ह रिडले कासवाची घोस्ट नेट मधून सुटका केली. यावेळी बोटमधील पर्यटकांनी त्याची चित्रफीत काढली.

सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये सर्वात जास्त ऑलिव रिडले या समुद्री कासावची घरटी आढळतात. एकूण अंडी उबवण्याचा यशस्वी दर सिंधुदुर्गमध्ये सर्वाधिक ७७.४७ टक्के नोंदवला गेला आहे. आणि यामुळे सिंधुदुर्ग मधील सागरी जैव विविधता अजून सुस्थितीत असल्याचे अधोरेखीत होते. आणि मासेमारीवर व पर्यटनावर त्याचा सकारात्मक परीणाम होतो.

घोस्ट नेट म्हणजे समुद्रात खडकाळ भागात अडकल्यामुळे सोडून दिलेली किंवा फाटलेली मासेमारीची जाळी जी समुद्री जीवांसाठी मृत्यचा सापळा बनवतात. यामध्ये मासे, समुद्री कासव आणि सस्तन प्राणी अंदाधुंदपणे अडकून मारले जातात. टिकाऊ प्लॅस्टिक पासून बनलेली अशी जाळी समुद्र तळाला अनेक वर्षे टिकून राहतात, प्रवाळ खडकांचे नुकसान करतात आणि नौकानयन मासेमारी साठी व पर्यटनासाठीही धोके निर्माण करतात. त्यामुळे अशा घोस्ट नेट वर उपाय योजना होणे गरजेचे बनले आहे.

rapan bottom