Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे | शाही रामनवमी उत्सवाची सांगता

इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे | शाही रामनवमी उत्सवाची सांगता

सांगता सोहळ्यात शाही थाटातील पंचमुखी महादेवाची पालखी मिरवणूक ठरली लक्षवेधी

आचरा : आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवाची सांगता रविवारी पहाटे लळीताने झाली. शनिवारी रात्री पंचमुखी महादेवाची मूर्ती पालखीत बसवून मंदिरा भोवती 'हर हर महादेव च्या जयघोषात सोमसूत्री प्रदक्षिणा करण्यात आली. बंदुकीच्या फैरी, आतिषबाजी व तोफेच्या सलामीने सुरू झालेल्या पालखीला हजारो भाविक उपस्थिती दर्शविली होती. देवस्थानच्या रामनवमी उत्सव सांगता सोहळ्यात शाही थाटातील पंचमुखी महादेवाची पालखी मिरवणूक लक्षवेधी ठरली. सायंकाळी मंदिरात श्री च्या पिंडी भोवताली केळीच्या सोपा पासून व आत मध्ये सव्वा मन तांदूळ घालून महा पूजा बांधण्यात आली होती.

रामनवमी उत्सवाच्या लळिताला वर्षातून एकदाच पंचमुखी महादेवाची मूर्ती पालखीत विराजमान करून रामेश्वर मंदिरास सोमसूत्री प्रदक्षिणा घालण्यात येते. या पालखी सोहळ्यास हजारो भाविक उपस्थित होते. या उत्सवात बाल कलाकारांसह तरुण ज्येष्ठांनीही तलवारबाजी, लाठीकाठी प्रात्यक्षिके सादर करीत रंगत आणली. पालखीनंतर उत्सवाच्या सांगतेचे कीर्तन रंगले. पहाटे कीर्तन आटोपल्यानंतर श्रींच्या पंचारतीबरोबर रघुपतीच्या दहा आरत्या एकाचवेळी बाहेर पडत श्री देव रामेश्वरच्या मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आल्या.



कीर्तनाची सांगता झाल्यावर सर्व उपस्थित भाविकांना श्रींचा प्रसाद म्हणून वहिवाटदार मिराशी यांच्या हस्ते श्रीफळ वाटण्यात आले. उत्सव सुरक्षितपणे पार पडावा म्हणून देवस्थान कमिटी, आचरा आरोग्य यंत्रणा, आचरा पोलीस कर्मचारी, ग्रामस्थ यांनी विशेष मेहनत घेतली. उत्सव पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार देवस्थान कमिटी अध्यक्ष प्रदिप प्रभुमिराशी, सचिव संतोष मिराशी,खजिनदार कपिल गुरव व कमिटी सदस्यांनी आभार मानले.

rapan bottom