मालवण : घुमडे येथील श्री देवी घुमडाई मंदिरात आज रविवारी रात्रौ ९ वाजता अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ यांच्या दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.
मालवण घुमडे गावचे ग्रामदैवत आई घुमडाई मंदिरात होणाऱ्या या दशावतारी नाट्य प्रयोगाचा नाट्य रसिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन घुमडे ग्रामस्थ व घुमडाई देवस्थांन च्या वतीने करण्यात आलेआहे.

