Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

राणे महाराज मठात रामनवमी उत्सव तसेच राणे महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात साजरा

राणे महाराज मठात रामनवमी उत्सव तसेच राणे महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात साजरा

कट्टा : श्री राम जय राम जय जय राम, अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री राणे महाराज की जय या जयघोषात मालवण तालुक्यातील वराड कुसरवेवाडी येथील राणे महाराज यांच्या मठात रामनवमी व राणे महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी राणे महाराज सेवा ट्रस्टचे पदाधिकारी, सभासद, बहुसंख्य भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानिमित्ताने सलग दोन दिवस राणे महाराज मठात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मठ परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने, रंगीबेरंगी फुलांनी सजविण्यात आला होता.

यावेळी रामनवमी निमित्ताने २६ मार्च रोजी मूर्ती अभिषेक, रामजन्माचे कीर्तन, रामजन्म सोहळा, महाआरती, अखंड महाप्रसाद, हरिपाठ, बुवा श्री अजित गोसावी व बुवा श्री ज्ञानदेव मेस्त्री यांचे सुश्राव्य भजन असे कार्यक्रम करण्यात आले.

प. पु. राणे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने २७ मार्च रोजी राणे महाराज यांच्या पादुकांवर अभिषेक, रामनाम जप व हरिपाठ, महाआरती, अखंड महाप्रसाद, प. पू. नामदेव महाराज भक्त मंडळी यांचा हरिपाठ व भजनाचा कार्यक्रम, राणे महाराज यांच्या पादुका व प्रतिमेसह पालखी मिरवणूक, श्री देवी माऊली प्रासादिक भजन मंडळ, किनळोस यांचे वारकरी भजन असे कार्यक्रम घेण्यात आले .या सर्व कार्यक्रमामुळे राणे महाराज मठ परिसरात भक्तिमय वातावरणात निर्माण झाले होते.

rapan bottom