Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

गतिमान विकासासोबतच जनतेच्या प्रश्नांची प्राधान्याने सोडवणूक यालाच प्राधान्य : सभापती प्रज्ञा चव्हाण

गतिमान विकासासोबतच जनतेच्या प्रश्नांची प्राधान्याने सोडवणूक यालाच प्राधान्य : सभापती प्रज्ञा चव्हाण

मालवण पंचायत समितीची पहिली मासिक सभा संपन्न

जनहिताच्या विविध प्रश्नांबाबत सदस्यांकडून प्रश्न उपस्थित करत सभागृहात चर्चा

मालवण | प्रतिनिधी : गतिमान विकासासोबतच जनतेच्या प्रश्नांची प्राधान्याने सोडवणूक करणे यालाच प्राधान्य राहणार आहे. शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी अधिक सक्षमपणे काम करावे. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही नेहमीच सोबत आहोत. योजनांचा जनतेला अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहूया. तालुक्यातील जनतेला भेडसावणाऱ्या समस्या व प्रश्नांची जलद सोडवणूक व्हावी यासाठी प्रशासनाने अधिक गतिमान व्हावे. असे सभापती प्रज्ञा चव्हाण, उपसभापती शाम झाड व सदस्यांनी सांगितले.

खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनात मालवण तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सभापती प्रज्ञा चव्हाण यांनी सांगितले.

मालवण पंचायत समितीची मासिक सभा सभापती प्रज्ञा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली धर्मवीर छत्रपती संभाजीराजे सभागृहात पार पडली. यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी पांडुरंग सावंत, उपसभापती श्याम झाड यांसह पंचायत समिती सदस्य दीपक सुर्वे, दीपक चव्हाण, छोटू ठाकूर, गणेश तोंडवळकर, संतोष गावडे, सीमा परळेकर मानसी भोगावकर, योजना कांबळी, माधुरी मसुरकर, रिया बावकर यांसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

जनहिताच्या दृष्टीने अनेक विषयांवर दीपक चव्हाण, सीमा परुळेकर, दिपक सुर्वे, छोटू ठाकूर, माधुरी मसुरकर, मानसी भोगावकर यांसह सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला. पंचायत समितीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. शासनाच्या घरकुल योजनेसह अन्य विविध योजना जनतेपर्यंत पोहचवून त्या यशस्वीपणे राबवणाऱ्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्याम चव्हाण व सर्व कर्मचाऱ्यांचे सर्व सदस्यांनी अभिनंदन केले..

त्या शेळ्यांचा मृत्यू झाला

पशु विभागा मार्फत शेळी मेंढी गट वाटप योजना राबवण्यात आली. जिल्हा बाहेरील एजंट नेमल्यात आले होते. लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या शेळ्या चांगल्या दर्जाच्या नव्हता. तरीही लाभार्थ्यांना जबरदस्तीने वाटप झाले. वाटप झाल्या नंतर लगेच काही दिवसात शेळ्या मयत त्यामुळे इन्शुरन्स ही मिळत नाही. गोरगरीब शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. यात भ्रष्टाचार अथवा चुकीच्या पद्धतीने कार्यवाही झालेली असल्यास चौकशी व्हावी. लाभार्थी शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी भूमिका पंचायत समिती सदस्या सीमा परुळेकर यांनी मांडली.

गावागावत कॅम्प लावा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि दिव्यांग अशा सवलतधारक प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे स्मार्ट कार्ड (आयडी कार्ड) अनिवार्य केले आहे. आधार कार्डऐवजी आता हे डिजिटल कार्ड सवलतीसाठी बंधनकारक असणार आहे. हे कार्ड १९९ रुपयांत एसटी डेपो या ठिकाणी मिळते. मात्र यासाठी ग्रामीण भागातून ग्रामस्थांना आर्थिक भुर्दंड सोसून तसेच शेतीची व अन्य कामे बाजूला ठेवून भर उन्हात यावे लागत आहे. याचा विचार करता ग्रामपंचायत पातळीवर याबाबत कॅम्प आयोजित करून या कार्डचे वितरण केल्यास ग्रामस्थांसाठी ते सोयीचे होईल अशी भूमिका पंचायत समिती सदस्य सीमा परुळेकर यांनी मांडली. यावेळी चर्चेत सहभागी होत सभापती प्रज्ञा चव्हाण, सदस्य दीपक चव्हाण व छोटू ठाकूर यांनी ग्रामस्थांच्या दृष्टीने गाव स्तरावर याबाबत कॅम्प आयोजित करावे अशी भूमिका मांडली. याबाबत एसटी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची पंचायत समितीत बैठक घेऊन नियोजन करण्याच्या सूचना सदस्य छोटू ठाकूर यांनी दिल्या.

एसटी फेऱ्या बाबत सूचना

मसुरे डांगमोडे या मार्गावर तसेच विभागातील अन्य मार्गांवर विद्यार्थी व प्रवास या दृष्टीने आवश्यक एसटी फेरीबाबत छोटू ठाकूर यांनी एस टी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. या चर्चेदरम्यान सदस्य दीपक चव्हाण यांनी ही सहभागी होत आपल्या विभागातील आवश्यक एसटी फेऱ्यांबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

आमदार निलेश राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मालवण तालुक्यातील विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे. अनेक विकास कामे प्रगतीपथावर आहेत. जन हिताच्या अनेक योजना राबवल्या जात आहेत. लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिले जात आहेत. मागील तीन वर्षापासून विविध कामांवरील साहित्य निधीचेही वितरण करण्यात आले होते. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सुमारे 193 कामावरील 78 लाख निधीचे वितरण करण्यात आले आहे. याबाबत सदस्य दीपक उर्फ बंडू चव्हाण यांनी आमदार निलेश आणि यांच्या अभिनंदनचा ठराव मांडला. तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

आरोग्य, कृषी व वीज समस्याबाबत मांडली भूमिका

सदस्य दीपक उर्फ बंडू चव्हाण यांनी आरोग्य कृषी वीज यासह तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातून मिळणाऱ्या सेवेत सुधारणा व्हावी. कृषी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचाव्यात. तालुक्यातील अनेक ठिकाणी वीज समस्या आहेत मात्र वीज अधिकारी उपस्थित नसतील तर या समस्या मांडायच्या कशा? त्यामुळे पुढील सभेपासून वीज अधिकारी अथवा प्रतिनिधींनी उपस्थित राहणे गरजेचे असल्याचे दीपक चव्हाण यांनी स्पष्ट केले. तसेच तालुक्यात सुरू असलेल्या भूमिगत वीज वाहिन्यांचे कामही दर्जेदार व योग्य पद्धतीने व्हावे याबाबतही दीपक चव्हाण यांनी भूमिका मांडली.

rapan bottom