Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

धार्मिकतेच्या नावाखाली बेकायदेशीर कृत्ये !

धार्मिकतेच्या नावाखाली बेकायदेशीर कृत्ये !

वराड गावातील रुद्रनाद फाऊंडेशन विरोधात ग्रामस्थांची आमदार निलेश राणे यांच्याकडे तक्रार

कारवाई करण्याबाबत आ. निलेश राणे यांच्या पोलीस अधीक्षकांना सूचना

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील वराड गावातील सावरवाड येथे "रुद्रनाद फाऊंडेशन" या नावाने चंद्रशेखर राणे व त्यांचे सहकारी यांनी धार्मिकतेच्या नावाखाली केलेली अघोरी कृत्ये, बेकायदेशिर व नियमबाह्य शिवलिंगाची स्थापना करुन ग्रामस्थांकडुन व भक्तांकडुन पैसे उकळणे, ग्रामस्थांच्या धार्मिक भावना भडकविणे, गांवातील सार्वजनिक शांतता व एकोपा यात तेढ निर्माण करुन अनधिकृतरित्या करत असलेल्या कृत्यांबाबत वराड गावातील श्री देव वेताळ ट्रस्ट पदाधिकारी व वराड ग्रामस्थ यांनी आमदार निलेश राणे यांच्याडे तक्रार निवेदन दिले. याबाबत जिल्हा प्रशासन व पालकमंत्री यांच्याकडे ही निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान ग्रामस्थांच्या तक्रारीच्या अनुषंगाने आमदार निलेश राणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. तसेच योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जातील असे सांगितले.

श्री देव वेताळ ट्रस्ट कमिटी गावकर पालटदार ग्रामस्थ तसेच सुमारे १२०० पेक्षा जास्त ग्रामस्थ यांच्या सह्या असलेले तक्रार निवेदन आमदार निलेश राणे यांना दिले. रुद्रनाद फाऊंडेशन" या नावाने चंद्रशेखर राणे व त्यांचे सहकारीbयांनी धार्मिकतेच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर कृत्यांचा पाढा उपस्थित ग्रामस्थांनी आमदार निलेश राणे यांच्यासमोर वाचला. रात्रीच्या वेळी गोवा राज्यातून अनेक महिला पुरुष याठिकाणी येतात. पहाटे प्रयत्न काहीतरी सुरु असते. ग्रामस्थांनी आमदार निलेश राणे यांना विनंती करू तात्काळ या सर्व बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.आमदार निलेश राणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधून तत्काळ योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आमदार निलेश राणे यांच्या या भूमिकेबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आभार मानले आहेत.

▪️अमित खोत | मालवण

rapan bottom