कु. मयुरी किरण कांबळी हिला बेस्ट चाइल्ड आर्टिस्ट अवॉर्ड
मालवण : शालेय अभ्यासक्रमां व्यतिरिक्त इतर ही परीक्षांना मुलांना प्रविष्ठ होण्याची संधी मिळावी आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी कलासाधना सामाजिक संस्था यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय रंगभरण स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंदर सडेवाडी शाळेमधील विद्यार्थांनी सहभाग घेतला होता. इयत्ता चौथी मधील कु. मयुरी किरण कांबळी हिला बेस्ट चाइल्ड आर्टिस्ट अवॉर्ड मिळाला आहे. त्याचबरोबर स्वानंद सचिन घागरे याला आकर्षक बक्षीस मिळाले. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंदर सडेवाडी प्रशालेला ॲक्टिव्ह स्कूल अवॉर्ड मिळाला. सर्व सहभागी विदयार्थ्याना राज्यस्तरीय सहभागी प्रमाणपत्र मिळाले.

स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी विविध स्पर्धेत उतरायला शिकले पाहिजे. यातून सराव होईल आणि मुलांना शिकता येईल, मुले उद्याच्या स्पर्धेच्या युगासाठी तयार होतील असे मत मार्गदर्शक शिक्षिका सौ. शुभांगी लोकरे -खोत यांनी मांडले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किरण कांबळी, उपाध्यक्ष सौ स्वाती सुर्वे, शिक्षिका अन्नपूर्णा गायकवाड, पालक प्रीती कांबळी, मानसी गोसावी, करिष्मा कानविंदे, स्वरा घागरे, धनश्री गोसावी, संदीप राठोड तसेच सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक व ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

