Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

दागिने चोरी प्रकरणी संशयितांना पोलीस कोठडी

दागिने चोरी प्रकरणी संशयितांना पोलीस कोठडी

मालवण येथे राहत्या घरातून झाली होती दागिन्यांची चोरी

सरकार पक्षातर्फे अभियोक्ता ॲड. नितीन कुंटे यांनी बाजू मांडली

फिर्यादीतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई व सोनाली कुबल यांनी सरकार पक्षास केले सहाय्य

मालवण : मालवण येथील राहत्या घरातून सोन्याचे दागिने चोरल्याच्या संशयावरुन दाखल गुन्ह्याचे तपासाकरीता संशयीत अमृता अमर म्हापणकर राह. कुंभारमाठ ता. मालवण व राघो सूर्यकांत राऊत राह. सुकळवाड ता. मालवण यांना मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साहेब मालवण यांनी 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. याकामी सरकार पक्षातर्फे अभियोक्ता ॲड. नितीन कुंटे यांनी बाजू मांडली व मुळ फिर्यादीतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई व सोनाली कुबल यांनी सरकार पक्षास सहाय्य केले.

दि. 17/01/2026 रोजी मालवण येथील समर्थ कृपा संकुलातील फिर्यादी महिलेच्या राहत्या घरातील मंगळसुत्रासहित सोन्याचे दागिने कपाटातून नाहीसे झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादीच्या घरात आलेल्या संशयीतांविरूद्ध फिर्यादीने मालवण पोलीस ठाण्यात दागिने चोरल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार मालवण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय्य संहिता कलम 305 अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याकामी मालवण पोलीसांचा तपास सुरु असताना संशयीत अमृता अमर म्हापणकर राह. कुंभारमाठ ता. मालवण व राघो सूर्यकांत राऊत राह. सुकळवाड ता. मालवण यांनी मे. सत्र न्यायालय ओरोस येथे दाखल केलेला अटकपूर्व जामीन मे. न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर मालवण पोलीसांनी संशयीताना ताब्यात घेतले.

मालवण पोलिसांनी दि. 25/03/2026 रोजी संशयितांना मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साहेब मालवण यांचे न्यायालयात हजर केले व गुन्ह्याचे तपासाकरीता 10 दिवस पोलीस कोठडीची मागणी केली. सुनावणीअंती गुन्ह्याचे तपासकामात संशयीतांची पोलीस कोठडीची आवश्यकता विचारात घेऊन मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साहेब मालवण यांनी संशयितांना 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. गुन्ह्याचे कामी पुढील तपास मालवण पोलिस ठाण्याचे स.पो.नि. श्री. खाडे करीत आहेत.

rapan bottom