Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

सिंधुदुर्गनगरी विकासाला गती

सिंधुदुर्गनगरी विकासाला गती

रस्ते, स्मारक सुशोभीकरण व सोलार हायमास्टसाठी महत्त्वपूर्ण निर्णय

सिंधुदुर्ग|प्रतिनिधी : सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण समितीची बैठक अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत प्राधिकरण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करून ठोस निर्णय घेण्यात आले.

बैठकीला प्राधिकरणाच्या सचिव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, अशासकीय सदस्य प्रभाकर सावंत, महेश ऊर्फ छोटू पारकर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला अपर जिल्हाधिकारी श्रीमती साठे यांनी प्राधिकरणाच्या कामकाजाविषयी सविस्तर माहिती दिली.

यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्राधिकरण क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांचे अंदाजपत्रक तातडीने तयार करून सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच सिंधुदुर्गनगरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे सुशोभीकरण, व्यापारी संकुल उभारणी तसेच जिल्हा मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासाठी स्वागत कमानीचा आराखडा सादर करण्यास सांगितले.

शहरातील पायाभूत सुविधांवर भर देत जलशुद्धीकरण केंद्राची देखभाल व दुरुस्ती करणे, तसेच पाणी गळती रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याचे निर्देशही देण्यात आले.

दरम्यान, स्वच्छतेच्या दृष्टीने प्राधिकरण क्षेत्रात कचरा संकलनासाठी दोन नवीन कचरा गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच प्रमुख रस्त्यांवर सोलार हायमास्ट दिवे बसविण्याचा ठराव संमत करण्यात आला.

rapan bottom