Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

गाबीत समाजाच्या वाडी वस्ती सीमाकंन सर्वेक्षणसाठी सक्षम शासकीय यंत्रणा उभारून सर्वेक्षण करावे!

गाबीत समाजाच्या वाडी वस्ती सीमाकंन सर्वेक्षणसाठी सक्षम शासकीय यंत्रणा उभारून सर्वेक्षण करावे!

मालवण गाबीत फिशरमेन फेडरेशन च्या वतीने मालवण तहसीलदारांना निवेदन

राहुल जाधव | प्रतिनिधी :
गाबीत समाजासाठी कार्यरत असलेल्या विविध संस्थेच्या तसेच समाजातील विविध राजकीय पक्षाशी जोडलेले लोकप्रतिनिधी, समाजासाठी कार्य करत असलेल्या व्यक्तींना सोबत घेऊन ग्राम स्तरावर गाबीत समाजाच्या वाडी वस्ती सीमाकंन, सर्वेक्षण करण्यासाठी सक्षम शासकीय यंत्रणा उभारून शहर व ग्रामीण स्तरावर त्वरित सर्वेक्षण करावे. अश्या मागणीचे निवेदन मालवण गाबीत फिशरमेन फेडरेशनच्या वतीने मालवण तहसीलदार गणेश लव्हे यांना देण्यात आले.

गाबीत समाजाच्या वस्त्या सर्वेक्षण, सीमाकंन प्रक्रिया स्थानिक गाबीत समाजास सोबत घेऊन वस्तुस्थिती दर्शक राबविण्यात यावे यासाठी मालवण गाबीत फिशरमेन फेडरेशनच्या वतीने मालवण तहसीलदार यांची भेट घेण्यात आली. यावेळी गाबीत फिशरमेन फेडरेशन चे अध्यक्ष बाबा मोडकर, सुरेश बापर्डेकर, छोटू सावजी, विकी चोपडेकर, रश्मीन रेगे, अन्वय प्रभू,हेमंत मोडकर, दाजीबा कुबल, बाबी जोगी आदी उपस्थित होते.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, राज्य सरकार तर्फे होणाऱ्या गाबीत समाज सर्वेक्षण व सीमाकंन प्रक्रिया प्रशासनाने स्थानिक गाबीत समाजास बरोबर घेऊन समन्वय्याने पूर्ण करणे गरजेचे आहे. प्रत्यक्ष रित्या या विषयी स्थानिक प्रशासन उदासीन आहे. राज्य सरकारने कोळी समाजाच्या प्रत्यक्ष सर्वेक्षण करून सीमाकंन करण्यासाठी आदेश दिले आहेत. कोळी समाज सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाही ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्या नंतर दिनांक 13/02/2026 रोजी विभागीय आयुक्त कोकण यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्हयातील गाबीत समाजातील गाव व वाडी हा लोकसंख्या गाबीत समाजाचे प्रत्यक्ष सर्वेक्षण व सीमाकंन करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी
कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या मार्फत मालवण, देवगड वेंगुर्ला तालुक्यातील तहसीलदार यांना 13/2/26 रोजी पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. प्रत्यक्ष मात्र स्थानिक तहसीलदार यांच्या कडून गाबीत समाजास अपेक्षित असलेले सर्वेक्षण होताना दिसत नसून सर्वेक्षण सीमाकंन गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.समाजाच्या भविष्यातील सामाजिक आर्थिक स्थिरतेसाठी हे सीमाकंन सर्वेक्षण होणे गरजेचे आहे.

मालवण खाडी, किनारपट्टीवर वसलेल्या शहर व ग्रामीण गाबीत समाजाच्या कुटुंबांसाठी हे सर्वेक्षण महत्वाचे आहे.आज ज्या किनारपट्टी ला बांधकाम काढायच्या नोटीस येत आहेत. सीमाकंन, सर्वेक्षण झाले असते तर ही वेळ आली नसती या सर्वेक्षणाच्या माध्यमातून गाबीत समाजाची लोकसंख्या, समाजाच्या माध्यमातून पारंपारिक मच्छिमारी साठी वापरात असलेल्या समुद्र, नदी, खाडी किनाऱ्याच्या जागा, किनारी रापण, लाकडी होड्या मासे खारवणे, सुकविणे तसेच नौका ठेवण्यासाठी, मासे खरेदी विक्री साठी तात्पुरत्या समुद्र स्वरूपात शेरी (सरकारी जागेत)कावणे तसेच अनेक वर्ष अश्याच जागेत बेघर गाबीत समाजाची घरे यांचे सर्वेक्षण, सीमाकंन होऊन गाबीत (कोळी) वाडे जाहीर होणे गरजेचे आहे.सीमाकंन व सर्वेक्षण साठी मुंबई मध्ये नियोजन पद्धतीने काम सुरु केले आहे. या उलट गाबीत मालवण तालुक्यातील गाबीत समाजाच्या वाडीवस्त्या मध्ये या सर्वेक्षणा विषयी माहिती नाही असे वातावरण किनारपट्टी भागात आहे.

गाबीत फिशरमन फेडरेशन च्या माध्यमातून गाबीत समाजासाठी कार्यरत असलेल्या विविध संस्थेच्या तसेच समाजातील विविध राजकीय पक्षाशी जोडलेले लोकप्रतिनिधी, समाजासाठी कार्य करत असलेल्या व्यक्तींना सोबत घेऊन ग्राम स्तरावर गाबीत समाजाच्या वाडी वस्ती सीमाकंन, सर्वेक्षण करण्यासाठी सक्षम शासकीय यंत्रणा उभारून शहर व ग्रामीण स्तरावर त्वरित सर्वेक्षण करावे. या विषयावर प्रशासन स्तरावर दुर्लक्ष होऊन गाबीत समाजाचा स्वतःच्या न्यायहक्कासाठी उद्रेक झाल्यास त्याला स्थानिक प्रशासन जबाबदार असेल. असा इशारा ही यावेळी गाबीत फिशरमेन फेडरेशन च्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला.

rapan bottom