Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

दांडी किनाऱ्यावर क्षमता नसतानाही बाहेरील व्यवसायिकाकडून अनधिकृत पॅरासेलिंग व्यवसाय

दांडी किनाऱ्यावर क्षमता नसतानाही बाहेरील व्यवसायिकाकडून अनधिकृत पॅरासेलिंग व्यवसाय

स्थानिक जलक्रीडा व्यवसायिकांचा विरोध ; बंदर अधिकाऱ्यांचे वेधले लक्ष

मालवण | प्रतिनिधी :- मालवण बंदर जेटी ते दांडेश्वर मंदिर या किनाऱ्यावर वॉटरस्पोर्ट्स व्यवसायाची अधिक क्षमता नसताना एका बाहेरील व्यवसायिकाकडून अनधिकृतपणे पॅरासेलिंग व्यवसाय सुरु करण्यात आला आहे. याबाबत स्थानिक जलक्रीडा व्यवसायिकानी बंदर विभागाचे लक्ष वेधले.

सदर व्यावसायिकाकडे परवान्याचे कागदपत्रे नसताना पर्यटन संचलनालयाने त्यास परवानगी दिलीच कशी असा सवाल व्यवसायिकानी उपास्थित करत त्याच्यावर कारवाई करून त्याचा व्यवसाय बंद करण्यात यावा तसेच नव्या व्यवसायिकांना परवानगी देण्याअगोदर मालवण ते दांडी किनारपट्टीची क्षमता आहे का ? याचा सर्व्हे बंदर विभाग व पर्यटन संचालनालयाने करावा अशी मागणी व्यवसायिकानी केली.

बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी नगरसेविका सौ. अन्वेषा आचरेकर, नगरसेवक महेश कोयंडे, पर्यटन व्यावसायिक दामू तोडणकर, रुपेश प्रभू, गौरव प्रभू, हेमंत रामाडे, नूतन रोगे, अमित सावंत, पांडुरंग पराडकर, सहदेव जोशी, अमोल सावंत आदी उपस्थित होते.

मालवण बंदर जेटी ते दांडेश्वर मंदिर या किनाऱ्यावर सध्या ६ वॉटरस्पोर्ट्स व ९ पॅरासेलिंग व्यवसाय सुरु आहेत. त्यामुळे या किनाऱ्यावर आणखी जलक्रीडा व्यवसाय करण्याची क्षमता नाही.

जलक्रीडा व्यवसायासाठी मालवण किनाऱ्याची क्षमता आता अपुरी असताना सदर अनधिकृत व्यवसायिकाकडून एखादा अपघात घडल्यास जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला.

याप्रश्नी आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधण्यात आले. व्यवसायिकांच्या समस्यां जाणून घेण्यासाठी आम. राणे यांनी लवकरच बैठक घेऊ असे आश्वासन दिले असल्याची माहिती नगरसेविका सौ. अन्वेषा आचरेकर यांनी दिली असून त्यावेळी होणाऱ्या बैठकीस जलक्रीडा व्यावसायिक, बंदर विभाग व पर्यटन संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

rapan bottom