Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

अनधिकृत वाळू उपशामुळे तळाशील गावाला धोका

अनधिकृत वाळू उपशामुळे तळाशील गावाला धोका

शेलटी जेटी ते सर्जेकोट बंदर दरम्यान वाळू उपसा बंद व्हावा

तळाशील ग्रामस्थांचे मालवण तहसीलदार यांना निवेदन

मंगेश नलावडे | मालवण : मालवण तालुक्यातील कालावल खाडीमधील शेलटी जेटी ते सर्जेकोट बंदर दरम्यान होणाऱ्या अनधिकृत वाळू उपशामुळे तळाशील गावाला धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे हा वाळू उपसा तात्काळ बंद करावा तसेच सदर भागात वाळू उपशाचे अधिकृत टेंडर लावू नये, अशा मागण्या तळाशील ग्रामविकास मंडळातर्फे तळाशील ग्रामस्थांनी मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे यांच्याकडे निवेदनातद्वारे केली. सदर वाळू उपसा बंद न झाल्यास ३० मार्च रोजी खाडी पात्रात उतरून आंदोलन छेडू, असा इशाराही ग्रामस्थानी दिला आहे.

तोंडवळी तळाशील येथील ग्रामस्थांनी मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे यांची भेट घेत कालावल खाडीतील वाळू उपशाबाबत निवेदन सादर केले. यावेळी तळाशील ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष संजय केळूसकर, अजित केणी, संजय तारी, भूपाळ मालंडकर, श्रीकृष्ण रेवंडकर, संजय जुवाटकर, हनुमंत देऊलकर, सचिन मालोंडकर, दत्तात्रय तांडेल, आनंद खडपकर, नंदा कोचरेकर, ताता टिकम, आपा चोडणेकर, आनंद कोचरेकर, गणेश रेवंडकर, सुहास कोचरेकर, विद्याधर पराडकर, रवि कोचरेकर, प्रकाश बापर्डेकर, गजा कांदळगावकर, कुणाल पाटकर आदी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

कालावल खाडी पात्रात शेलटी जेटी ते सर्जेकोट बंदर दरम्यान अनधिकृतपणे वाळू उपसा होत आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाळू उपशामुळे तोंडवळी मधील तळाशीलच्या किनाऱ्याच्या भुभागाची प्रचंड प्रमाणात धूप होत आहे. तळाशिल येथील पिण्याचे पाणी क्षारयुक्त झाल्याने पिण्यास आरोग्यासाठी घातक ठरत आहे. तसेच तळाशिल येथील खाडी किनाऱ्यालगतची माड बागायत वाहून गेलेली असून उर्वरित माड बागायतीला खारट पाण्यामुळे धोका निर्माण झालेला आहे. तसेच या वाळू उपसामुळे खाडी किनाऱ्यालगतचा धुप प्रतिबंधक बंधारा वाहून गेलेला आहे, असे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे.

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने एका खटल्यात अंतिम निर्णय देताना तळाशिल येथील A गटांमधील वाळु पूर्णता बंद केली होती. तळाशिल हे एक वाळुचे बेट आहे व आजुबाजुस कांदळवन प्रजाती व माशाचे प्रजनन ठिकाण असल्याने तो भाग अतिशय संवेदनशील आहे तसेच येथील दोनशे कुटुंबे मच्छिमारीवर अवलंबून आहेत. वाळू उपशामुळे त्यांचा रोजीरोटीचा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे. दिवस रात्र चालू असलेला अनधिकृत वाळू उपसा बंद न झाल्यास गावास धोका निर्माण होऊ शकतो व झालेला देखील आहे. तसेच ग्रामस्थांची नदीत वाहुन गेलेली जागा वाळुने पुन्हा भरून त्वरीत नदीकिनारी धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

▪️अमित खोत | मालवण

rapan bottom