विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमासह रील स्पर्धेचेही आयोजन
सिंधुदुर्ग : श्री रामनवमी उत्सवा निमित्त २६ मार्च रोजी श्री देव पाचोबा देवस्थान, डामरे येथे विविध धार्मिक- सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन श्री देव पाचोबा मित्रमंडळ, डामरे - फोंडाघाट यांच्या वतीने करण्यात आले आहे. या निमित्ताने रामनवमी उत्सव २०२६ निमित्त रील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
श्री देव पाचोबा देवस्थान येथे २६ मार्च रोजी सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वाजता हळदीकुंकू, सायं ५ वाजता होम मिनिस्टर स्पर्धा, सायं ६ ते ७.३० श्री सद्गुरू वारकरी दिंडी भजन कुडाळ, रात्रौ ८ ते ९.३० शिवप्रेमी वारकरी दिंडी भजन गवाणे, रात्रौ १० वाजता नादबंधन ग्रुप कणकवली आयोजित संगीत भजन जुगलबंदी बुवा श्री चिन्मय सावंत, बुवा श्री रोहित सरनोपत, बुवा श्री जयेश घाडी यांच्यात जुगलबंदी होणार आहे. रात्रौ १२ वाजता मोफत लकी ड्रॉ असणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव पाचोबा मित्रमंडळ, डामरे यांनी केले आहे.

