मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हापरिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी मालवण दौऱ्यात मालवण नगरपरिषद येथे उपस्थित राहून नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर यांची सदिच्छा भेट घेत त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पुनम चव्हाण, समाज कल्याण सभापती सिद्धार्थ जाधव, महिला व बालकल्याण उपसभापती अश्विनी कांदळकर, नगरसेवक महेश कांदळगावकर, नगरसेविका नीना मुंबरकर, मेघा सावंत, शर्वरी पाटकर, भाग्यश्री मयेकर उपस्थित होते. नगरपरिषद स्तरावर विविध विकासकामे, स्वच्छता व नागरी सुविधा यांसह विविध विषयात सकारात्मक चर्चा करण्यात आली.
▪️अमित खोत | मालवण

