घुमडे येथील दत्ताराम बिरमोळे यांच्या गाईने जुळ्या वासरांना दिला जन्म

मालवण : मालवण तालुक्यातील घुमडे येथील दत्ताराम बिरमोळे यांच्या गाईने जुळ्या वासरांना जन्म दिल्याची दुर्मिळ घटना घडली आहे. दोन्ही वासरू व गाय सुखरूप असल्याचे बिरमोळे यांनी सांगितले.

घुमडे येथील दत्ताराम रमाकांत बिरमोळे हे शेतकरी असून अनेक पिढ्या पासून गाई गुरे पालन करतात. आताही त्यांच्याकडे 11 गुरे आहेत. त्यातील एका गाईने जुळ्या वासरांना जन्म दिला आहे.

आपल्या बघण्यात ही पहिलीच घटना असून परिसरातही कुठे गाईने जुळ्या वासरांना जन्म दिल्याचे ऐकीवात नाही. दुर्मिळ अशी ही घटना असून आपल्या घरी गाईने दोन वासरांना जन्म दिला. याबाबत आनंद असल्याचे दत्ताराम बिरमोळे यांनी सांगितले.
▪️ अमित खोत, मालवण

