Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

'बेटी बचाओ बेटी पढाओ' मालवण तालुक्यात डिजिटल चित्ररथ जनजागृती

'बेटी बचाओ बेटी पढाओ' मालवण तालुक्यात डिजिटल चित्ररथ जनजागृती

तहसीलदार गणेश लव्हे यांच्या हस्ते शुभारंभ | महिला व बालविकास विभागाचा उपक्रम

मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने 'बेटी बचाओ बेटी पढाओ' या मालवण तालुक्यातील डिजिटल चित्ररथ जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन मालवण तहसीलदार गणेश लव्हे यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्ह्यात बालिका/महिलांविषयक योजना प्रचार प्रसिद्धी करणेच्या अनुषंगाने 'बेटी बचाओ बेटी पढाओ' डिजिटल चित्ररथाचे आयोजन करण्यात आले आहे. मालवण मध्ये या कार्यक्रमा चा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी मालवण तहसीलदार गणेश लव्हे यांसह, महसूल नायब तहसीलदार नीलिमा प्रभुदेसाई, बाल विकास प्रकल्प अधिकारी मालवण उल्का खोत-हजारे, निवासी नायब तहसीलदार विनायक जांभेकर, पुरवठा शाखा निरीक्षक शीला निकस, अभय केंद्र मालवण सहाय्यक संरक्षण अधिकारी मेघा वजराटकर, अभय केंद्र मालवण बहुउद्देशीय कर्मचारी निकिता पाटकर तसेच महसूल चे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.

'बेटी बचाओ- बेटी पढाओ' ही केंद्र पुरस्कृत योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत मुलीचा जन्मदर वाढविण्याच्या दृष्टीकोनातून जनजागरण मोहिमे अंतर्गत गर्भवती मातांची नोंदणी. मुलींच्या जन्माचे स्वागत करण्याबाबत जनजागृती, वाढदिवस साजरा करणे, आरोग्य शिबिरे आयोजित करणे. मुलगी वाचवा- मुलगी शिकवा याबाबत मार्गदर्शन, गुड्डा-गुड्डी बोर्ड त्यावर मुला-मुलींची जन्मसंख्या लिहून ते सार्वजनिक ठिकाणी लावणे, पथनाट्ये इ.जनजागृती कार्यक्रम जिल्ह्यात आयोजित करण्यात येत आहेत.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, सिंधुदुर्ग यांचे सुचनेनुसार जिल्ह्यात बालिका, महिलांविषयक योजना प्रचार, प्रसिद्धी करणेच्या अनुषंगाने 'बेटी बचाओ बेटी पढाओ' डिजिटल चित्ररथाचे आयोजन करण्यात आले आहे. मालवण मध्ये या कार्यक्रमाचा शुभारंभ करून बालिका, महिलांविषयक विविध योजना, कायदे व सायबर सुरक्षा जाहिरात प्रचार याबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.

▪️अमित खोत | मालवण

rapan bottom