श्रावण सोमवार निमित्त महापूजा व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
भाऊ भोगले | बागायत : श्री सद्गुरु भक्त सेवा न्यास (रजि.) संलग्न श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे प्रति वर्षाप्रमाणे यावर्षीही 19 ऑगस्ट रोजी श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षी श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे श्रावण महिन्यात श्री सत्नारायणाच्या पूजेचे आयोजन केले जाते. त्याt प्रमाणे याही वर्षी हि सत्यनारायणाची महापूजा असून भाविकांच्या वतीने अकरा पूजेचे आयोजन करण्यात आलेले आहे सकाळी ८ वा. श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा आर्चा, 9 वा. सामूहिक सत्यनारायण महापूजा
10 वा. नैवेद्य आणि महाआरती ,दु. 12.30 वा. १०८ महंत मठाधिश प .पू. सद्गुरु श्री गावडे काका महाराज यांचे मार्गदर्शन, दु.1 वा. अन्नदान महाप्रसाद,
सायं. 7 वा . स्थानिक सुस्वर भजनांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

