▪️गणेश गांवकर | मालवण : संजय स्मृती देऊळवाडा बाळगोपाळ मित्रमंडळ, मालवण यांच्यावतीने भव्य दिव्य स्वरूपात नाईट बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा 'देऊळवाडा प्रीमियर लीग' या स्पर्धेचे उद्घाटन उपनगराध्यक्ष दिपक पाटकर यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी संजय स्मृती देऊळवाडा संघाच्या ज्येष्ठ खेळाडुंचा प्रेक्षणीय सामना खेळविण्यात आला. या सर्व ज्येष्ठ खेळाडूंचा भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला. त्यानंतर या स्पर्धेतील लीग पद्धतीने सोळा सामने खेळविण्यात आले. स्पर्धेतील उर्वरित सामने २० मार्च रोजी होत आहेत.

स्पर्धेतील विजेत्या संघाला १०,००० रुपयांचे पारितोषिक व आकर्षक चषक, तर उपविजेत्या संघाला ६,००० रुपयांचे द्वितीय पारितोषिक व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. प्रत्येक सामन्यातील सामनावीरास आकर्षक भेटवस्तू तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर यांनाही विशेष पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.
यावेळी नगरसेविका निना मुंबरकर, माजी नगरसेवक जगदिश गावकर, रवी मालवणकर, महेश बांदेकर, सौगंधराज बादेकर, बाबु गावकर, अमित डिचवलकर, संजय वराडकर, कमा गावकर, पराग चव्हाण, अर्जुन चव्हाण, भूषण चव्हाण, राजू आचरेकर, आपा मराळ, चेतन म्हापणकर, शिवाजी म्हापणकर, भूषण म्हापणकर, दिनेश डिचवलकर, विजय फणसेकर, संतोष इब्रामपुरकर, यशवंत गावकर, जितेंद्र वाळके, समीर वर्दम, नितीन वर्दम, शरद गावकर, महेश गावकर, जयु वीर, प्रमोद गावकर, राजू गावकर, राजू किर, अर्जुन चव्हाण, शामा आजगावकर, प्रमोद मराळ, रवी देऊलकर, सुभाष मालवणकर, भूषण राऊळ, संकेत भाटे, विश्वास आचरेकर, बंटी आचरेकर, गणेश गावकर व इतर उपस्थित होते. यावेळी देऊळवाडा शांतीसागर मैदानाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच संजय स्मृती देऊळवाडा बाळगोपाळ मित्रमंडळच्या वतीने उपनगगराध्यक्ष दिपक पाटकर, नगरसेविका निना मुंबकर, माजी नगरसेकर जगदीश गावकर, महेश बांदेकर, रवी मालवणकर यांचा सत्कार करण्यात आला.

आज होणारे सामने
श्री राम स्पोर्टस विरुद्ध उमेश स्पोर्टस, पियुश स्पोर्टस विरुद्ध आर.एम.डी. आर्वी स्पोर्टस विरुद्ध श्री राम स्पोर्टस, पियुश स्पोर्टस विरुद्ध श्रेयस स्पोर्टस, आदी गौरव स्पोर्टस विरुद्ध श्री स्पोर्टस, ए.एम स्पोर्टस विरुद्ध अर्श स्पोर्टस हे लीग पद्धतीचे सामने होणारे आहेत. तसेच यानंतर स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने व अंतिम सामना होणार आहे. तरी सर्वांनी या स्पर्धेस उपस्थित रहावे असे आवाहन
मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
▪️अमित खोत | मालवण

