Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

स्व. राजनभाई आंगणे स्मृती चषक

स्व. राजनभाई आंगणे स्मृती चषक

एम. क्रिकेट ॲकॅडमी, सावंतवाडी आयोजित 16 वर्ष खालील क्रिकेट स्पर्धा

मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग मैदान येथे 19 मार्च ते दोन एप्रिल या कालावधीत आयोजन

द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक दिनेश लाड, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर व मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचा शुभारंभ

मालवण प्रतिनिधी : एम. क्रिकेट ॲकॅडमी, सावंतवाडी आयोजित स्वर्गीय. राजन भाई आंगणे स्मृती चषक 16 वर्ष खालील क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी प्रीमियर लीग च्या स्वरूपात हा चषक खेळला गेलेला आणि ती स्पर्धा जिल्हा मर्यादित होती, ज्या मध्ये प्रमुख पाच संघांमध्ये विभागून ही स्पर्धा खेळवली गेलेली होती. परंतु या वर्षी या स्पर्धेचे स्वरूप विस्तारित करून बाहेरील चार संघांना व जिल्ह्यातील दोन संघांना सामाविष्ठ करून स्पर्धा खेळवण्यात येत आहे. बाहेरील संघांमध्ये मुंबई, गोवा, कोल्हापूर व सांगली हे चार संघ आहेत. असे मिळून एकूण सहा संघांमध्ये ही स्पर्धा १९ मार्च पासून २ एप्रिल पर्यंत मालवण च्या बोर्डिंग ग्राउंड वर रंगणार आहे. ही स्पर्धा वन डे च्या स्वरूपात असेल. प्रत्येक दिवशी एक सामना खेळवला जाईल अशी माहिती आयोजकांनी दिली.

19 मार्च रोजी सकाळी उद्घाटन सोहळा पार पडला. त्यावेळी द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक दिनेश लाड, मालवण नगरपरिषद उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, जॉन नरोना, परशुराम पाटकर, माजी खेळाडू पपु परब, सो सा रत्नागिरीतील ग्राऊंड चे मालक श्री केतन सावंत, एम क्रिकेट ॲकॅडमी चे अध्यक्ष उदय नाईक, सोपटे सर, गोवा एम सी सी क्रिकेट ॲकॅडमी चे प्रशिक्षक संदीप नाईक, एम. क्रिकेट ॲकॅडमी चे प्रशिक्षक राहुल रेगे आदि उपस्थित होते.

मालवण उपनगराध्ययक्ष दीपक पाटकर यांनी विशेष प्रयत्नातून बोर्डिंग ग्राउंड या स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिल्या बद्दल व सहकार्य बाबत त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच अन्य प्रमुख पाहुण्यांचे देखील आभार मानून त्यांना सन्मानित करण्यात आले.

प्रमुख अतिथी दिनेश लाड व उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तसेच ग्राउंड ची पूजा करण्यात आली. राष्ट्रगीत नंतर सामन्याला सुरुवात करण्यात आली. या पूर्ण स्पर्धेचे पंच म्हणून ॲम्रोज अलमेडा व बंटी केरकर यांची निवड केलेली आहे. त्याचप्रमाणे गुणलेखक म्हणून ज्ञानेश केळूसकर यांना नेमले आहे, व यू ट्यूब लाईव्ह द्वारे ऑनलाइन दर्शकांपर्यंत स्पर्धा पोहचवण्याचे काम शेखर परब करणार आहेत. याप्रसंगी १६ वर्षाखालील महाराष्ट्र संघात आपले नाव लौकिक केलेला खेळाडू भगवान पांढरे या गुणवंत खेळाडूचा सत्कार एम क्रिकेट च्या वतीने दिनेश लाड यांच्या हस्ते करण्यात आला.

rapan bottom