मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील चिंदर भटवाडी शाळेचा विद्यार्थी तनुश धोंडू चिंदरकर याने गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा क्रमांक मिळवला आहे.
प्रशालेच्या शिक्षिका निशिगंधा वझे आणि मैना कारंडे यांनी तनुश याच्या अभ्यासासाठी विशेष मेहनत घेतली. कु. तनुश हा भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांचा सुपुत्र आहे. तनुश याच्या अभिनंदनीय यशा बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

फोटो : तनुश चिंदरकर

