मालवण | प्रतिनिधी : मालवण शहर मंडल येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान अंतर्गत दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. कार्यशाळेमध्ये पक्ष संघटन बळकट करणे, कार्यकर्त्यांना पक्षाची विचारधारा, कार्यपद्धती तसेच जनसंपर्क याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

अभियानात माजी आमदार अजितराव गोगटे यांनी बूथ व्यवस्थापन, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी इतिहास आणि विकास, जिल्हा संयोजक प्रसन्ना (बाळू) देसाई, ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यशाळा वक्ते विलास हडकर यांनी वैचारिक अधिष्ठान, संध्या तेरसे यांनी कार्य विस्ताराची आपली दृष्टी, राजू राऊळ यांनी पक्ष आणि कार्यपद्धती, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष व कार्यशाळा वक्ते श्रीकृष्ण (राजू) परब व महेश मांजरेकर यांनी आपल्या सरकारची कामगिरी आणि अंलबजावणी आदी विषयांवर उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

प्रशिक्षण शिबिरात योगा, सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गीते, यांसह अन्य राष्ट्रीय एकात्मकतापर कार्यक्रम घेण्यात आले. भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी अशोक तोडणकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, मालवण मंडल अध्यक्ष धोंडी चिंदरकर व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आप्पा लुडबे, कार्यक्रम व्यवस्था नगरसेवक रविकिरण तोरस्कर, निवास व्यवस्था सचिन आंबेरकर, सभासद नोंदणी संदीप बोडवे, यांनी काम पाहिले.
वाघवणे येथील उद्योजक सचिन आंबेरकर यांच्या नानीज् ग्रँड येथे ही कार्यशाळा संपन्न झाली. या प्रशिक्षण अभियानात मालवण शहर मंडलातील पदाधिकारी व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
▪️अमित खोत | मालवण

