मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन आयोजित मानाच्या महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्य पद स्पर्धे मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्य संघातून मालवण नगर परिषद व्यायाम शाळेचा खेळाडू श्री गणेश हनुमंत सातार्डेकर याचा ६५ ते ७० किलो वजनी गटा मध्ये महाराष्ट्रा तुन टॉप टेन् मध्ये निवड होऊन टॉप सिक्स मध्ये मानाचे स्थान पटकवले. रोख रक्कम प्रमाणपत्र, चषक देऊन मान्यवर यांच्या हस्ते गणेश सातार्डेकर यांचा गौरव करण्यात आला.
६५ ते ७० किलो गट बॉडी बिल्डिंग सोबत याच गटातील क्लासिक फिजिक प्रकार मध्ये देखील टॉप टेन मध्ये स्थान पटकवत सातवा क्रमांक मिळविला. गणेश सातार्डेकर याची पुणे येथे २८ ते ३० मार्च २०२६ या मानाच्या भारत श्री स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून निवड करण्यात आली.
कुडाळ येथील empire जिम चा खेळाडू श्री जय प्रकाश उर्फ बाळा नार्वेकर याची हि ७० किलो वजनी गटा मदर टॉप टेन् मध्ये निवड झाली व मास्टर गट (४० वर्ष वरील )प्रकारात महाराष्ट्र संघतून निवड करण्यात आली.

भारतातील मान्यता प्राप्त शासन मान्य संघटना मधून खेळली जाणारी हि मानाची स्पर्धा या मध्ये निवड झाल्या बद्दल गणेश याचे अभिनंदन करण्यात आले.गणेश यास श्री प्रविण हिंदळेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. श्री जयप्रकाश नार्वेकर यांना empire जिम चे श्री प्रथमेश केळबाईकर याचे मार्गदर्शन लाभले. सिंधुदुर्ग संघ व्यवस्थापक श्री महेश परब मालवण यांनी काम पहिले.
खेळाडू ची निवड झाले बद्दल सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर अससोसिएशन च्या वतिने अध्यक्ष श्री शंकर कांबळी सचिव तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू व पंच श्री किशोर शांताराम सोन्सूरकर सर यांनी विशेष अभिनंदन केले. मालवण मध्ये सिंधुदुर्ग किल्ला च्या साक्षीने भविष्यात राज्य राष्ट्रीय स्पर्धा आयोजन करण्या बाबत राष्ट्रीय अध्यक्ष श्री संजय मोरे सर यांना विनंती करण्यात आली.
▪️अमित खोत | मालवण

