सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदी प्रमोद कामत तर उपाध्यक्षपदी दादा साईल यांची बिनविरोध निवड झाली. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकला आहे.

कुडाळ तालुक्यातील पावशी जिल्हा परिषद मतदार संघातून शिवसेना महायुतीच्या माध्यमातून विजयी झालेले व आता जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी विराजमान झालेले दादा साईल यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी माझी निवड केल्याबद्दल कोकणचे भाग्यविधाते आमचे लाडके नेते खासदार आदरणीय श्री. नारायणराव राणे साहेब, पालकमंत्री श्री. नितेशजी राणे साहेब, आमदार श्री. निलेशजी राणे साहेब, आमदार श्री. दीपकजी केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ताजी सामंत, भाजप जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकरजी सावंत, शिवसेना गटनेते श्री. संजयजी आग्रे तसेच महायुतीतील सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.

आपण सर्वांनी दाखवलेला विश्वास, प्रेम आणि पाठिंबा यामुळेच मला पावशी मतदारसंघातून ही संधी मिळाली. विशेषतः पावशी विभागातील कार्यकर्त्यांनी घेतलेली अहोरात्र मेहनत, निष्ठा आणि समर्पण यामुळेच हे यश शक्य झाले आहे.
पक्ष नेतृत्वाने आणि जनतेने माझ्यावर ठेवलेला विश्वास कायम राखत समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणारे व सर्वांना साजेसे विकासकाम करण्याचे मी मनापासून आश्वासन देतो. पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार.
▪️ शानू वालावलकर | मालवण

