Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

असामान्य कर्तृत्व असलेले चतुरस्त्र नेतृत्व...!

असामान्य कर्तृत्व असलेले चतुरस्त्र नेतृत्व...!


आमदार निलेशजी नारायणराव राणे साहेब वाढदिवस अभिष्टचिंतन...

असामान्य कर्तृत्व, दातृत्व आणि जनसामान्यांचे हक्काचे नेतृत्व म्हणजे आमदार निलेश नारायणराव राणे हे होय..!महाराष्ट्र राज्याच्या राजकीय पटलावरील डॅशिंग, अभ्यासू व प्रत्येकाला आपले वाटणारे दिलदार व्यक्तिमत्व असलेले निलेश राणे लाखोंच्या हृदयात स्थान निर्माण करून आहेत. आक्रमक वक्तृत्व शैलीने विरोधकांना सळो की पळो करून सोडणारे निलेश राणे सहकार्यांसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी मात्र हक्काचे आणि आपुलकीचे नाते नेहमीच जपतात. जो व्यक्ती निलेश राणे यांच्या संपर्कात आला तो त्यांचा चाहता होतोच. सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची असलेली तळमळ व प्रश्नाच्या मुळाशी जावून काम करण्याची पद्धत आदर्शवत आहे. भाषेवरील प्रभुत्व आणि विधिमंडळातील त्यांची अभ्यासू भाषणे महाराष्ट्र अनुभवतोय. सोबतच जनता आणि कार्यकर्त्यांचे स्थानही त्यांच्या हृदयात अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्यांनी ज्यांनी निलेश राणे जवळून अनुभवले ते सर्वजण सांगतील आमदार निलेश राणे म्हणजे जनतेला आणि कार्यकर्त्यांना जपणारे हळव्या मनाचे दिलदार नेतृत्व होय....!



आमदार निलेश राणे हे वडील माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या प्रमाणेच चतुरस्त्र व्यक्तिमत्व. वडिलांप्रमाणे प्रत्येक विषयाची सखोल माहिती, अभ्यासूपणा व प्रभावी व आक्रमक वक्तृत्व शैली त्यांना प्राप्त आहे. प्रत्येक विषयातील सखोल अभ्यास त्यांचा उच्च विभुषितपणा व नेतृत्व संपन्नता स्पष्ट करणारा ठरतो. कुठलाही विषय असो निलेश राणे यांचे भाषण म्हणजे संदर्भ, आकडेवारी आणि स्पष्टता यांचा सुरेख मिलाप ठरतो.


विरोधकांवर आक्रमक शैलीत शाब्दिक प्रहार करून नामोहरम करणे.  जे आहे ते थेट आणि स्पष्ट हा निलेश राणे यांचा स्पष्ट वक्तेपणा सर्वांनाच भावतो  भावतो.

उच्चशिक्षित निलेश राणे वयाच्या २८ व्या वर्षी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून खासदार झाले. आपल्या लोकप्रतिधी कार्यकाळात देशाच्या सर्वोच्च सभागृहात त्यांनी अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण पध्दतीने संसदेतील चर्चेत सहभाग नोंदवला. एक उत्तम संसदपटू म्हणून लोकसभेतील त्यांचा कार्यकाळ एखाद्या अनुभवी खासदारा प्रमाणे यशस्वी असाच राहिला. जनहिताचे अनेक प्रश्न मांडले. विकासासाठी मोठा निधी खेचून आणण्यात ते यशस्वी ठरले.



पद असो वा नसो हा माणूस नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांत राहिला. त्यांनी कार्यकर्ते जपले, माणसे जपली. म्हणूनच निलेश राणे प्रत्येक सहकाऱ्याला, कार्यकर्त्याला आपले वाटतात.   कार्यकर्त्यांसाठी, जनहिताच्या प्रश्नांसाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ठामपणे सोबत राहणारे हे हक्काचे नेतृत्व आहे.

सर्वसामान्य जनता, पक्षाचा कार्यकर्ता, सहकारी यांना प्राधान्याने न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी निलेश राणे खंबीरपणे पाठीशी उभे राहतात आणि न्याय मिळवून देतातच.


वडिलांवर अपार प्रेम असलेले हे व्यक्तिमत्व वडिलांविरोधात कोणतीही राजकीय टीका सहन करत नाहीत. नाती आणि माणसे जपणाऱ्या या नेतृत्वाच्या हृदयात अनेक संवेदना खोलवर जपलेल्या आहेत.

आमदार निलेश राणे यांचा स्वभाव जनहित व माणसे जपणारा आहे. आपुलकी जपणारा आहे. ज्यांनी ज्यांनी निलेश राणे जवळून अनुभवले ते प्रत्येक जण सांगतात, 'निलेश राणेंसारखा सच्चा मनाचा दिलदार नेता नाही'.



हळव्या मनाचे....

विरोधकांवर राजकीय टीका करणे हे राजकीय पटलावर सर्व स्तरातून सुरूच असते. निलेश राणे यांचे शाब्दिक प्रहार तर विरोधकाना नेहमीच घायाळ करतात. मात्र हेच निलेश राणे कार्यकर्ते, जनता यांच्यासोबत असतात तेव्हा हळव्या मनाचे निलेश राणे, चर्चेत हास्य, आपलेपणाची झालर प्रत्येकजण अनुभवतो आणि निलेश राणे यांचा फॅन होतो.


असे हे दिलदार आणि कर्तृत्ववान नेतृत्व मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघात तन, मन, धन अर्पण करून सेवा कार्य करत आहेत.  जेष्ठ पदाधिकारी यांचे मार्गदर्शन व युवा वर्गाच्या सोबतीने आमदार निलेश राणे जनतेत राहून जनतेला अपेक्षित असे कार्य करतं आहेत. साहेब तुमच्या नेतृत्वात कुडाळ मालवणचा सर्वांगीण विकास सदैव घडत राहो. आपणास दीर्घायुष्य लाभो...!



*प्रत्येक अधिवेशनात घुमतोय आमदार निलेश राणे यांचा बुलंद आवाज*

आमदार निलेश राणे यांच्या विजयानंतर कुडाळ मालवण मतदारसंघ गतिमान विकासाच्या मार्गावर स्वार झाला आहे. मागील दहा वर्षातील विकासाचा बॅकलॉग भरून काढला जात आहे. मतदार संघातील जनतेचे ज्वलंत प्रश्न विधिमंडळात मांडून आमदार निलेश राणे जनतेचा आवाज बनून अधिवेशन गाजवत आहेत. प्रत्येक विषयाची सखोल आणि अभ्यासपूर्ण मांडणी या माध्यमातून प्रत्येक अधिवेशनात आमदार निलेश राणे यांचा बुलंद आवाज घुमत आहे.


▪️अमित खोत, मालवण

rapan bottom