🖋️ शानू वालावलकर | मालवण : मालवण शहरातील जनतेची सेवा करायची आहे….. त्यांच्या समस्यां प्राधान्याने सोडवयाच्या आहेत…. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात स्वच्छ, सुंदर आणि आदर्श मालवण शहर बनवणे हाच श्वास आणि हाच ध्यास घेऊन सतत कार्यरत असणारे डॅशिंग नेतृत्व, मालवण नगरपरिषद स्वच्छता व आरोग्य सभापती सौ. पुनम नागेश चव्हाण या होय..!
मालवण नगरपरिषदेतील उच्चविभूषित असे हे लोकनेतृत्व नगरसेविका म्हणून विजयी झाल्या नंतर सातत्याने जनतेचे प्रश्न घेऊन ते सोडवण्यासाठी तत्पर दिसून येत आहे. पक्ष संघटनेनेही त्यांची दखल घेत मालवण नगरपरिषद शिवसेना नगरसेवक गटाच्या गटनेते पदाची महत्वपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे दिली आहे. सोबतच मालवण नगरपरिषदेच्या स्वच्छता व आरोग्य सभापती पदाची अत्यंत महत्वाची जबाबदारी ही त्यांच्या हाती सोपवण्यात आली आहे. स्वच्छता व आरोग्य सभापती या पदाला न्याय देत असताना त्या जनतेत राहून सातत्याने सेवा कार्य करत आहेत.

पुनम चव्हाण यांना शिक्षण आणि राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. सरोज परब या पूनम यांची आई. शांत, संयमी, अभ्यासू आणि कर्तृत्ववान नेतृत्व अशी सरोज परब यांची विशेष ओळख. शिक्षकी पेशातून त्यांनी अनेक विध्यार्थी घडवले त्याच प्रमाणे मसुरे जिप मतदार संघाच्या विकासातही त्यांचे योगदान मोलाचे राहिले. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनात सरोज परब यांनी जिप अध्यक्षपद यशस्वीपणे भुषवले. त्यांची कन्या असलेल्या पुनम चव्हाण यांनी उच्चशिक्षण हे पाहिले लक्ष ठेवले. एमए, डीएड, बीएड, बीएलएसएलएलबी अश्या विविध पदवी प्राप्त केल्या आहेत. उच्च शिक्षणा सोबत उच्च संस्कार अंगी असलेल्या पुनम चव्हाण यांची प्रभावी वक्तृत्व शैली दैवी देणगी प्राप्त व्हावी अशीच आहे.
गेली सात ते आठ वर्षे मालवण शहर प्रभाग 4 व संपुर्ण परिसरातील जनतेशी सतत संपर्कात राहून, त्यांच्या प्रत्येक सुख दुःखात सहभागी होणारे हे नेतृत्व जनतेला आपल्या घरातील सदस्या प्रमाणे वाटते. आपल्या सेवा कार्यातून तसेच विकासाच्या दूरदृष्टी विचारशैलीतून पूनम चव्हाण यांनी मतदारांच्या हृदयात स्थान निर्माण केले. म्हणूनच निवडणुक निकालापूर्वी ज्या मोजक्या उमेदवारांचा विजय निश्चित मानला गेला त्यात पूनम चव्हाण हे नाव अग्रस्थानी होते. त्यांनी मिळवलेला विजय आणि घेतलेले मताधिक्य जनतेच्या विश्वासाची पोचपावती ठरले.
हॉटेल उद्योग क्षेत्रात यशस्वी उद्योजिका म्हणून कार्यरत असलेल्या पुनम चव्हाण यांना त्यांचे पती आंबा बागायतदार उद्योजक नागेश चव्हाण यांची खंबीर साथ लाभली. पुनम चव्हाण यांनी कौटुंबिक जबाबदारीही सक्षमपणे सांभाळत आहेत. त्यांचे पती नागेश चव्हाण सांगतात, पत्नी पुनम चव्हाण यांची खंबीर साथ आमच्या सर्व प्रवासात अत्यंत मोलाची ठरली आहे.
एकूणच प्रत्येक क्षेत्रात पुनम चव्हाण यांच्या यशाचा आलेख उंचावणारा आहे. नगरसेविका, गटनेत्या, स्वच्छता व आरोग्य सभापती हा मागील तीन महिन्यातील त्यांचा प्रवास मोठी जबाबदारी घेऊन आला आहे. आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात तसेच नगराध्यक्षा आणि सर्व सहकारी नगरसेवक यांच्या सोबतीने स्वच्छ, सुंदर आणि आदर्श मालवण शहर ही संकल्पना यशस्वी ठरेल. स्वच्छता व आरोग्य सभापती पुनम चव्हाण जनतेला अपेक्षित असा यशस्वी कार्यकाल पुर्ण करतील करतील. हाच विश्वास जनतेतून व्यक्त होत आहे.
▪️अमित खोत, मालवण

