Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

चौके जि. प. प्राथमिक शाळेत खाऊगल्ली उपक्रमास उत्तम प्रतिसाद

चौके जि. प. प्राथमिक शाळेत खाऊगल्ली उपक्रमास उत्तम प्रतिसाद

मालवण | प्रतिनिधी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चौके नंबर १ मध्ये शालेय मुलांचा 'खाऊ गल्ली' हा उपक्रम संपन्न झाला. या उपक्रमात शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग घेत आठवडा बाजाराप्रमाणे आपली दुकाने थाटून वेगवेगळे खाद्यपदार्थ विक्रीसाठी आणि खाण्यासाठी ठेवले होते. या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद लाभला.

शाळेच्या या उपक्रमाचा शुभारंभ चौके गावचे सरपंच पी. के. चौकेकर तसेच ज्येष्ठ ग्रामस्थ सदाशिव गावडे गुरुजी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी उद्योजक बिजेंद्र गावडे, माजी सरपंच सुरेश चौकेकर, सचिन आंबेरकर, ज्येष्ठ पत्रकार संतोष गावडे, वावळ्याचे भरड मंडळाचे अध्यक्ष दत्ता गावडे, माजी सभापती मनीषा वराडकर, निवृत्त शिक्षक विजय चौकेकर, ग्रामपंचायत सदस्य जयश्री कदम, विशाखा चौकेकर, संघर्ष बचत गट निरा सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितीन गावडे, उपाध्यक्ष पूर्वा गावडे, माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कृष्णा चौकेकर, आशा स्वयंसेविका सिद्धाली गावडे, प्राथमिक शाळा मुख्याध्यापक भाग्यश्री कुनुरे, मनीषा डाके तसेच पालक ग्रामस्थ उपस्थित होते.

'खाऊ गल्ली' या उपक्रमात शालेय मुलांनी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ शाळेच्या आवारात विक्रीसाठी ठेवले होते. यावेळी चौकेतील ग्रामस्थांनी मुलांकडून मनसोक्त खरेदी केली. यामुळे बालवयातच मुलांना व्यापार कसा करावा, याचा धडा मिळाला. शाळेतील लहान मुलांनी भरवलेली 'खाऊ गल्ली' सर्वांना आनंद देऊन गेली. 'खाऊ गल्ली' हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक शाळेतील शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती, माता पालक संघ व पालकांनी मेहनत घेतली.

rapan bottom