स्थानिक कासव मित्रांचे कांदळवन कक्षाच्या मदतीने सेवाकार्य
राहुल जाधव | मालवण : मालवण वायरी भूतनाथ समुद्र किनारा येथील कांदळवन विभाग - दक्षिण कोंकण (वनपरिक्षेत्र मालवण ) समुद्री कासव अंडी उबवणी केंद्रामध्ये ऑलीव्ह रिडले या समुद्री कासवाची अंडी सुरक्षितरित्या सांभाळण्याचे व उबवण्याचे काम चालू आहे.
दिनांक १५ जानेवारी २०२६ तारकर्ली येथील दत्तराज चव्हाण, संकेत तारी, प्रसाद माडये, महेंद्र चव्हाण, यांना तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर ओलीव्ह रिडले या समुद्री कासवाची १०१ अंडी निदर्शनास आली. अंड्यांच्या सुरक्षितेसाठी व देखभालीसाठी कांदळवन कक्षाच्या नियंत्रणा खाली त्या अंड्यांना वायरी येथील समुद्री कासव अंडी उबवणी केंद्रामध्ये स्थलांतरीत करण्यात आले होते.

दिनांक १५ मार्च २०२६ , जवळपास ५९ दिवसांच्या कालावधी नंतर ऑलिव्ह रिडले या समुद्री कासावाची पाच पिल्ले रात्री १०.३० ते ११.०० वाजण्याच्या सुमारासf अंड्यामधून बाहेर पडल्याचे तेथील स्थानिक रहिवासी कासव मित्र श्रीकांत माडये यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्वरित कांदळवन विभागाला संपर्क केला. यावेळी तेथे यूथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेचे संस्थापक सदस्य दर्शन वेंगुर्लेकर, कांदळवन कक्ष - बीच मॅनेजर आनंद बांबार्डेकर, गणेश माडये, रसिका माडये, कोमल माडये, युगा माडये, चेतन मांजरेकर उपस्थित होते.

स्थानिक कासव मित्रांनी कांदळवन कक्षाच्या मदतीने पिल्लांना सुखरुप समुद्रामध्ये सोडले. पुढील दिवसांमध्ये अधिक पिल्ले बाहेर पडतील आणि ती देखील समुद्रात सुखरूप सोडण्यात येतील असे स्थानिकांनी सांगितले.
▪️अमित खोत, मालवण

