Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

डांगमोडे येथील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पंचक्रोशी जामसंडे कबड्डी संघ विजेता

डांगमोडे येथील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पंचक्रोशी जामसंडे कबड्डी संघ विजेता

मालवण : नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे आणि डांगमोडे ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन यांच्या मान्यतेने आणि मालवण तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्यातून मसुरे डांगमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिर येथे होणाऱ्या भवानी मातेच्या वार्षिक गोंधळ उत्सवानिमित्त दिनांक १३ मार्च रोजी मसुरे डांगमोडे श्री देव रवळनाथ मंदिर नजीक मैदानावर संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेमध्ये पंचक्रोशी जामसंडे कबड्डी संघ विजेता तर गिरोबा स्पोर्ट्स सांगेली कबड्डी संघ उपविजेता ठरला. विजेत्या संघाला रोख रुपये १० हजार व शिवाजी ठाकूर स्मृती चषक तर उपविजेत्या संघाला रोख रुपये ६ हजार आणि शिवाजी ठाकूर स्मृती चषक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

स्पर्धे मध्ये एकूण १५ संघाने सहभाग घेतला होता. तृतीय क्रमांक रियांश स्पोर्ट्स तेंडोली कबड्डी संघ आणि चतुर्थ क्रमांक श्री लक्ष्मीनारायण वालावल कुडाळ कबड्डी संघ यांनी प्राप्त केला. तृतीय आणि चतुर्थ क्रमांक विजेत्या संघाला प्रत्येकी दोन हजार रुपये बक्षीस देण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट पकड म्हणून मकरंद पाटकर (पंचक्रोशी जामसंडे), उत्कृष्ट चढाई सिराज भडसाळे (पंचक्रोशी जाम संडे) आणि उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू मयूर नाईक (गीरोबा स्पोर्ट्स सांगेली) यांची निवड करण्यात आली. यांना प्रत्येकी रोख रुपये पाचशे आणि शिवाजी ठाकूर स्मृती चषक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. स्पर्धेमध्ये सहभागी सर्व खेळाडू आणि प्रशिक्षक यांची मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. बक्षीस वितरण प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक संदेश ठाकूर म्हणालेत डांगमोडे सारख्या गावामध्ये जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करून जिल्ह्यातील खेळाडूंना एक मोठी संधी देण्याचा नवतरुण मित्र मंडळाचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे यापुढेही डांगमोडे गावांमध्ये अजून चांगले उपक्रम हाती घेऊन डांगमोडे गाव जिल्ह्याच्या नकाशावरती चमकवण्याचा आम्हा सर्वांचा नेहमीच प्रयत्न राहील. यावेळी सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे सहकार्यवाह नितीन हडकर यांचे कबड्डी क्षेत्रातील योगदानाबद्दल विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.



स्पर्धेचा बक्षीस वितरण प्रसंगी येथील प्रसिद्ध उद्योजक संदेश शिवाजी ठाकूर, पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर, प्रथमेश ठाकूर, माजी पंचायत समिती सदस्य गायत्री ठाकूर, ओमकार ठाकूर, राजेंद्र ठाकूर, महेश ठाकूर, अनिल ठाकूर, अमित ठाकूर, मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग ठाकूर, स्वप्निल ठाकूर, विष्णू ठाकूर, संजय ठाकूर, अक्षय ठाकूर, अमित ठाकूर, देविदास ठाकूर, मंगेश चव्हाण, परेश चव्हाण, सोमा ठाकूर, हरी ठाकूर, प्रकाश ठाकूर, किशोर ठाकूर, समीर ठाकूर, जितेंद्र परब, बाबू आंगणे, पुरुषोत्तम शिंगरे, राजेश गावकर,अजित कदम, समीर कदम, किशोर ठाकूर, परशुराम ठाकूर, कमलेश ठाकूर, मोहन ठाकूर, अनिल ठाकूर, बुधाजी ठाकूर, मंगेश ठाकूर, रमेश ठाकूर, दीपक ठाकूर, हर्ष कोंडस्कर, विशाल बागवे, प्रथमेश पराडकर, गुरुनाथ ठाकूर, बंटी ठाकूर, गणू ठाकूर, आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि मालवण पंचायत समितीच्या नूतन सभापती प्रज्ञा चव्हाण, मालवण उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, नूतन पंचायत समिती सदस्य बंडू चव्हाण, मनस्वी भोगावेकर, रिया बावकर, महेश बागवे,अशोक बागवे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. स्पर्धा निरीक्षक म्हणून नितीन हडकर पंचप्रमुख प्रीतम वालावलकर आणि स्पर्धेसाठी पंच म्हणून मधुकर पाटील, प्रशांत वारीक, किशोर पाताडे, जनार्दन बंगे, वसीम शेख, आप्पा मुंज, संदेश पाटकर, पंकज राणे यांनी काम पाहिले. स्पर्धेचे यशस्वी नियोजन पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे यांनी केले होते..

rapan bottom