अष्टपैलू कालानिकेतन मालवण यांच्या वतीने पुरस्कार सोहळा
उद्योजक दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती
राहुल जाधव | प्रतिनिधी : मालवण अष्टपैलू कालानिकेतन यांच्या वतीने; कै. नटवर्य कै. राम गणेश गडकरी स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार २०२६ यावर्षी मालवण - तारकर्ली येथील जेष्ठ नाट्य कलाकार श्री. आप्पाजी उर्फ रतिलाल श्रीधर तारी यांना प्रदान करतं त्यांना सन्मानित करण्यात आले. शाल श्रीफळ, मानपत्र, स्मृति चिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
मालवण भरड येथील श्री दत्त मंदिर येथे अष्टपैलू कलानिकेतन, मालवण यांच्या वतीने नटवर्य कै. राम गणेश गडकरी स्मृतिप्रीत्यर्थ, देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार २०२६, आणि सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा २०२६ वर्ष १५ वे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर, सिने अभिनेते अभय खडपकर, नगरसेवक महेश कांदळगांवकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, परीक्षक संजय धुपकर, ( गोवा ) श्री भाई शेवडे, (धारगळ ) अष्टपैलू कलानिकेतन चे अध्यक्ष भालचंद्र केळुसकर, सुधीर कुर्ले, विलास देऊलकर, कीर्तन विशारद, महेश धामपूरकर, सौ. राजश्री तारी, अभय कदम, राजू बिडये आदि उपस्थित होते.

यावेळी बोलताना उद्योजक दत्ता सामंत म्हणले, गेली ५० वर्षे रंगमंचावर कार्यरत असलेले रतीलाल तारी यांचा सत्कार केला ही त्यांच्या कार्याची पोच पावती अष्टपैलू कलानिकेतन ने आज दिली आहे. तारकर्ली गावात सर्व सामान्य नागरिक म्हणून सर्वांना एकत्र घेऊन चालवणारे, सर्वांशी मनमिळावू स्वभाव ठेवून प्रत्येकाला मार्गदर्शन करणारे हे व्यक्तीमत्व आहे. त्यांचा सन्मान या मंडळाने केला त्यासाठी मी धन्यावाद व्यक्त करतो. आज मोबाईल युग आहे, शिक्षणा सोबत संस्कार ही महत्वाचे आहेत. मुलांना लहान वयात रंगमंचाची ओळख करून देत आहात यातूनच भविष्यात नटसम्राट होऊ शकतात हे पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे. लहाणपणी संस्कार वडीलधाऱ्या माणसांनी देणं हे महत्वाचे आहे. असे कार्यक्रम होत राहणे गरजेचे आहे. कला किंवा भजन हा छंद असू नये ती साधना असली पाहीजे तर त्याचा आपल्या जीवनात उपयोग होईल. आपली श्रद्धा महत्वाची आहे. समाजात प्रबोधन करायचे असेल तर भजन कीर्तन हे आवश्यक आहे. मामा वरेरकर नाट्य गृहात राज्यस्तरीय एकांकिका केली पाहिजे. आपल्या मुलांनी राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेतला पाहिजे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगले कलाकार घडवित आहात त्याबद्दल अष्टपैलू कालानिकेत चे कौतुक च आहे. असे यावेळी उद्योजक दत्ता सामंत म्हणाले.

अष्टपैलू कला निकेतन मालवण च्या वतीने किर्तन विशारद श्री.महेश आत्माराम धामापूरकर टोपीवाला हायस्कूल मालवण यांचा सन्मान करण्यात आला.
त्यावेळी आपल्या मनोगतात त्यांनी कीर्तनाबद्दलची जागरूकता व्यक्त केली आपला कीर्तनातील प्रवास त्यांनी सर्वांसमोर मांडला व इतर नवीन तरुणांना किर्तन शिकण्याचे आवाहन श्री.महेश आत्माराम धामापूरकर त्यांनी केले. या कार्यक्रमा प्रसंगी सत्कारमूर्ती आप्पाजी तारी यांच्या सौभाग्यवती सौ. राजश्री तारी, यांचा ही सत्कार करण्यात आला. सत्कार कार्यक्रम समरोपा नंतर सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा २०२६ या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
▪️अमित खोत | मालवण

