Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

पाककला स्पर्धेत रामेश्वर महिला बचत गट प्रथम ; खेळ पैठणीचा स्पर्धेत भक्ती शिवराम आचरेकर विजयी !

पाककला स्पर्धेत रामेश्वर महिला बचत गट प्रथम ; खेळ पैठणीचा स्पर्धेत भक्ती शिवराम आचरेकर विजयी !

मालवण नगरपालिका महिला व बालकल्याण समितीच्या वतीने पाककला स्पर्धा व खेळ पैठणीचा कार्यक्रम रेकॉर्ड ब्रेक प्रतिसादात संपन्न

मालवण | प्रतिनिधी : महिला दिनानिमित्त मालवण नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने मामा वरेरकर नाट्यगृहात महिलांसाठी घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धेत मालवणच्या रामेश्वर महिला बचत गटाने प्रथम क्रमांक मिळविला तर खेळ पैठणीचा स्पर्धेत भक्ती शिवराम आचरेकर विजयी ठरल्या.

मालवण नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने पाककला स्पर्धा आणि खेळ पैठणीचा हा कार्यक्रम पार पडला. या स्पर्धाना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमास ५०० हुन अधिक महिला उपस्थित होत्या. पाककला स्पर्धेत २५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. यामध्ये द्वितीय क्रमांक समृद्धी महिला बचतगट व तृतीय क्रमांक भाग्यश्री महिला बचत गटाने मिळविला. तर खेळ पैठणीचा स्पर्धेत ३५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. यामध्ये द्वितीय क्रमांक हेमांगी आचरेकर व तृतीय क्रमांक सरस्वती परब यांनी मिळविला.

पाककला स्पर्धेसाठी विनय गावकर व संजय गावडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेसाठी नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागप्रमुख रसिका कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन अक्षय सातार्डेकर यांनी केले.

विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले तर सर्व सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी ६५ वर्षावरील होतकरू ज्येष्ठ महिलांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष ममता वराडकर, महिला व बालकल्याण सभापती सौ. अन्वेषा आचरेकर, उपसभापती सौ. अश्विनी कांदळकर, माजी नगराध्यक्ष अर्चना मीठबावकर, माजी उपनगराध्यक्ष स्वप्नाली नेरुरकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, नगरसेविका दर्शना कासवकर, मेघा गावकर, अनिता गिरकर, नीना मुंबरकर, महानंदा खानोलकर, भाग्यश्री मयेकर, महिला व बालकल्याण विभागप्रमुख रसिका कुलकर्णी आदी व इतर उपस्थित होते.

rapan bottom