Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक मालवणात उभारण्याचा संकल्प !

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक मालवणात उभारण्याचा संकल्प !

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तसेच श्री गुरु तेगबहादुर यांच्या बलिदानाच्या ३५० व्या वर्षा निमित्त मालवणात बाईक रॅली.

युथ फॉर भारत - मालवण या संस्थेमार्फत आयोजन.

राहुल जाधव | मालवण : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तसेच श्री गुरु तेगबहादुर यांच्या बलिदानाच्या ३५० व्या वर्षा निमित्ताने युथ फॉर भारत - मालवण या संस्थेमार्फत भव्य बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती. मालवण सागरी महामार्ग देऊळवाडा ते राजकोट किल्ला अशी भव्य बाईक रॅली काढण्यात आली. दरम्यान, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक मालवणात उभारण्याचा संकल्प या रॅलीच्या निमित्ताने करण्यात आला.

या बाईक रॅली प्रसंगी संस्थेचे संयोजक श्री चेतन आजगावकर, सहसंयोजक, श्री श्रीराज बादेकर,श्री मोरेश्वर गोसावी, श्री अमेय नाईक, मालवण नगरसेवक श्री मंदार केणी, नगरसेवक श्री ललित चव्हाण, श्री रविकिरण तोरसकर,नगरसेविका निना मुंबरकर, शिल्पा खोत,अमृता अनिकेत फाटक, भाऊ सामंत, अमित भगत, सत्यम भगत, मीत भगत, रोहित पोकार, ज्ञानेश गोवेकर, कुशल अंधारी, रत्नाकर कोळंबकर, गणेश चव्हाण सुशांत तायशेटये, राणी तायशेटये, अनिता निव्हेकर, वैदेही सारंग, बाजीराव काळे, ऐश्वर्य मांजरेकर, गणेश मेस्त्री, गणेश मोंडकर, प्रभुदास आजगावकर, सौगंधराज बादेकर, निनाद बादेकर, दिलीप वायंगणकर, साई पारकर, मंदार सरजोशी,सिंधुदुर्ग किल्ल्यावरील श्री सकपाळ, श्री लोके, हिरेन, लक्ष्मी दराडे, प्रवीण शिंदे, समीर शिंदे, संजय शिंदे,पवन बांदेकर उपस्थित होते.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाच्या अगोदर १४ वर्षे पूर्वी बलिदान झालं त्यामध्ये एक नाही तर तीन पिढ्याचे बलीदान झाल आहे. स्वतः गुरू तेग बहादूर सिंग त्याची पत्नी, त्यांची दोन मुलं नातवंड अशा तीन पिढ्याचे बलिदान त्या काळात झालं आहे.
छत्रपती संभाजी महाराज आणि गुरू तेग बहादूर सिंग यांच्यात साम्य एकच आहे ते म्हणजे त्याचा शत्रू हा एकच तो म्हणजे औरंगजेब आणि त्यांच्या मागण्या सुद्धा तशाच होत्या तू मुस्लिम धर्म स्वीकार म्हणजे हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्म स्वीकारावा यासाठी ही दोन मोठी बलिदान झाली आहेत.

आज उत्तर भारतला जे आपली संस्कृती मठ मंदिर किंवा हिंदू स्वतःला म्हणून घेत आहेत.याच कारण गुरू तेग बहाद्दर सिंग आहेत. त्यानंतर संपूर्ण दक्षिण भारत किंवा पूर्ण भारता चा मध्य भारत छत्रपती संभाजी महाराज यांनी जर मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर आजचा इतिहास फार वेगळा असला असता आज आपण आपल्या नावाने ही ओळखले गेलो नसतो.या दोन महापुरुषांचे स्मरण व्हावं युवकांसमोर यावा यासाठी युथ फॉर मालवण या मालवण मधील युवक एकत्र येत आशा प्रकारचा कार्यक्रम मालवण मध्ये करण्याचा ठरविण्यात आले.

उद्या चा गुरू तेग बहाद्दूर सिंग यांच्या जीवन चरित्रावर जो कार्यक्रम आहे आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान मास चालू आहे.त्याची जाणीव जागृती होण्यासाठी आज ही बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती.या बाईक रॅलीला युवक आणि समजतील मालवण वासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असे श्री प्रा.पवन बांदेकर यांनी सांगितले.

या कार्यक्रमा प्रसंगी शिवप्रेमी श्री भूषण साटम यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानावर कविता सादर केली. आपले मनोगत व्यक्त करताना मालवण शहरात आपल्या धर्मवीर संभाजी महाराज यांचे स्मारक नाही आहे. त्यासाठी आज बलिदान मासा निमित्त संकल्प करूया पुढच्या वर्षी बलिदान मासा निमित्त आपले लाडके धर्मवीर संभाजी महाराज यांचे स्मारक मालवण शहरात उभा राहील असा संकल्प केला.

श्री वैभव पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री पलाश चव्हाण यांनी केले.कार्यक्रमाच्या शेवटी श्री मंदार सांबारी यांनी शिव प्रार्थना सादर केली.यावेळी मालवण मधील असंख्य शिवप्रेमी महाविद्यालयीन तरुण आणि मातृ शक्ती उपस्थित होते.
उद्या गुरू तेग बहाद्दूर सिंग यांच्या जीवनावर आहे.आणि त्याला हिंदवी चादर अस म्हटलं जातं चादर याचा अर्थ ओढून घेणे संरक्षण करणे जे संरक्षण त्यांनी पूर्ण हिंदुस्थानाच केलेलं आहे.हिंदू धर्माच केलेलं आहे.म्हणून त्याला हिंदवी चादर अस समजलं जातं. या कार्यक्रमाला युवक वर्ग आणि मालवण मधील जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन युथ फॉर भारत मालवण यांच्या वतीने करण्यात आले.

rapan bottom