आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून १ कोटी ५३ लाख निधी मंजूर
शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ
शानु वालावलकर | मालवण : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार निलेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या सरंबळ भाटीवाडी नदी लागत धूप प्रतिबंधक बंधारा बांधणे कामाचा शुभारंभ शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आला.

शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नाने या धुप प्रतिबंधक बंधाऱ्या साठी १ कोटी ५३ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यांबद्दल सरंबळ शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते ग्रामस्थांनी आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.


या उदघाटन कार्यक्रम सोहळ्या प्रसंगी राजन कोरगावकर, उमेश कोरगावकर, सुरेश चेंदवणकर, प्रदीप चेंदवणकर, सुनील चेंदवणकर, बापू तोंडवलकर, संतोष तोंडवळकर, प्रशांत तोंडवळकर, दत्ता वराडकर,रुपेश भाटकर, गुरूदास चेंदवणकर, विजय तोंडवळकर,विजया तोंडवळकर, लिलावती वराडकर, किशोर भोवर, अमर भोवर, शिवाजी भोवार, पपी भोवर , गोटू कदम, सखाराम कदम, सुनील परब, मयूर जाधव, दिपक जाधव, भाग्यश्री सरंबळकर, गणपत सरंबळकर, रुद्र तोंडवळकर,आदी शिवसेना ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते.


