दुपारी १ वाजता महाप्रसाद
रात्री ९ वाजता दशावतार

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील घुमडे गावचे ग्रामदैवत श्री देवी घुमडाई मंदिरात उद्या १४ मार्च रोजी सकाळी १० वाजता त्रैवार्षिक सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे.या निमित्त दुपारी १ वाजता महाप्रसाद व रात्री ९ वाजता श्री देवी सातेरी महिला दशावतारी नाट्य मंडळ पावशी यांचा "भक्तांची पाठीराखी आदिमाया" हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन घुमडे ग्राम विकास मंडळ अध्यक्ष दत्ता सामंत यांनी केले आहे.

