मालवण | प्रतिनिधी : मालवण महान गावातील उत्कृष्ट भजनी बुवा म्हणून नावलौकिक असलेले संतोष लक्ष्मण साळसकर वय ५१ यांचे बुधवारी रात्री निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक बहीण, असा मोठा परिवार आहे. संतोष साळसकर हे गावातील प्रत्येक प्रत्येक संस्कृतिक- धार्मिक कार्यक्रमामध्ये मोठ्या आवडीने सहभागी होत असत. महान पंचक्रोशी मध्ये त्यांनी उत्कृष्ट भजन कला सादर करून रसिकांची वाहवा मिळविली होती. त्यांच्या आकस्मित निधनाने महान गावावर शोककळा पसरली आहे. महान गावातील हरहुन्नरी व्यक्तीमत्व असलेला हिरा हरपला अशी खंत ग्रामस्थां मधून व्यक्त केली जात आहे. महान येथील स्मशान भूमीत बुधवारी रात्रौ अंत्यसंस्कार करण्यात आले.

संतोष साळसकर यांचे निधन.
