मालवण शिवसेनेच्या वतीने १६ मार्च रोजी आयोजन
मालवण | प्रतिनिधी : कुडाळ मालवण मतदार संघाचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण शिवसेनेच्या वतीने सोमवार १६ मार्च रोजी सकाळी ९ वाजता मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी सहभागी व्हावे. असे आवाहन मालवण शिवसेना वतीने करण्यात आले आहे. आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन त्या निमित्ताने करण्यात आले आहे. मोठया उत्साहात वाढदिवस सोहळा साजरा होणार आहे.
▪️अमित खोत | मालवण

