Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

वेशभूषा स्पर्धेचे आयोजन

वेशभूषा स्पर्धेचे आयोजन

हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण

मालवण | प्रतिनिधी : हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण यांच्या वतीने मालवण शहरात गुढीपाडव्याच्या दिवशी 19 मार्च रोजी सायंकाळी 5 वा. मालवण बाजारपेठ मार्गांवरून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा निघणार आहे. यावर्षी स्वागत यात्रेचे 23 वे वर्ष आहे. दर वर्षी प्रमाणे हिंदूप्रेमी व मालवणवासीय यांच्या उत्स्फूर्त सहभागातून भव्यदिव्य स्वरूपात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा निघणार असून त्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. घोडे, चित्ररथ, देखावे, कोल्हापूर येथील मर्दानी खेळ, नेरूर येथील शिमगोत्सव, विविध वेशभूषा यांसह ढोल ताश्याच्या गजरात भगव्या उत्साहात स्वागत यात्रा निघणार आहे.

वेशभूषा स्पर्धा

हिंदू नववर्ष स्वागत यात्रा निमित्ताने याही वर्षी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बालवाडी ते चौथी, पाचवी ते दहावी असे बाल गट व शालेय गट असणार आहेत. तर खुल्या गटात पुरुष व महिला असे दोन गट असणार आहेत. चार गटात ही स्पर्धा होणार असून प्रत्येक गटातील विजेत्या पाच स्पर्धकांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे. तरी स्पर्धकांची नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी बंटी केनवडेकर मोबा : 9422596682, अनिकेत फाटक : 9421046390, अमिता निवेकर : 9923921507 यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती संयोजक अमित खोत व भाऊ सामंत यांनी केले आहे.

▪️अमित खोत | मालवण

rapan bottom