सिंधुदुर्ग : कणकवली येथे पार पडलेल्या मेगा कॅम्प मध्ये करण्यात आलेली आरोग्य तपासणी एका बालकासाठी जीवनदान देणारी ठरली आहे.
दिनांक 27 फेब्रुवारी रोजी कणकवली येथे मेगा कँप आयोजित करण्यात आला होता. सदर शिबिरामध्ये 66 बालकांची तपासणी करण्यात आली. शिबिरामध्ये करण्यात आलेल्या '२ डी इको' चाचणी दरम्यान कु. झेवियर फर्नांडिस राहणार देवबाग तालुका मालवण या 9 वर्षीय मुलाच्या हृदयात काही समस्या असल्याचे निदान झाले होते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, या मुलाला पुढील उपचार व शस्त्रक्रिया करणेसाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत सामंजस्य करार झालेल्या रुग्णालयात मुंबई येथे संदर्भित करणेत आले. सदर बालकावर यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया झाली आहे. या लहान मुलासाठी मेगा कॅम्प वरदान ठरला आहे.
24 मार्च रोजी सावंतवाडीत मेगा कँप
24 मार्च रोजी उप जिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे मेगा कँप आयोजित करणेत आला आहे. सदर मेगा कँप मध्ये किम्स हॉस्पिटल ठाणे येथून तज्ज्ञ डॉक्टर यांची टीम उपस्थित राहणार आहे. 0 ते 18 वर्षे वयोगटात बालकांची 2D इको तपासणी करण्यात येणार आहे. तरी यां शिबिराचा जास्तीत लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग आरोग्य विभागा मार्फत करण्यात आले आहे.

