आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून निधी मंजूर
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन
शानु वालावलकर | मालवण : जिल्हा वार्षिक योजने मधून मंजूर झालेल्या मालवण वायरी गर्देवाडी मार्ग ग्रामा 429 रस्ता खडीकरण डांबरीकरण कामाचे भूमिपूजन भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
मालवण वायरी गर्देवाडी 429 मार्ग खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजने मधून 5 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार निलेश राणे यांनी हा निधी मंजूर करून दिल्या बद्दल वायरी ग्रामस्थानी आभार मानले आहेत.

या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी उप सभापती श्याम झाड, सरपंच भगवान लुडबे, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, भाजपा तालुका उपाध्यक्ष केदार झाड, प्रसाद चव्हाण, उपसरपंच प्राची माणगांवकर, प्रतिक्षा केळुसकर, शाखा प्रमुख संदेश तळगांवकर, देवानंद लोकेगावकर,कृष्णा देउलकर,पाडुरंग मायनाक, मुन्नाझाड, विकास मसुरकर, दाजी सावजी,अरूण तळगांवकर,यशवत गावकर, अमित मायबा, मंदार घारे, विराज आचरेकर, शेखर भगत, राजन चव्हाण,भाई मांजरेकर,आधी पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.

