मालवण | प्रतिनिधी : मालवण पंचायत समिती सभापती सौ. प्रज्ञा भाऊ चव्हाण यांनी सभापती पदभार स्वीकारल्या नंतर आमदार निलेश राणे यांची भेट घेतली. यावेळी आमदार निलेश राणे यांनी सभापती प्रज्ञा चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी सिंधुदुर्ग शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, शिवसेना जिल्हापरिषद गटनेते दिपक नारकर, शिवसेना महिला जिल्हप्रमुख जिप सदस्या दिपलक्ष्मी पडते, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, कुडाळ सभापती मिलिंद नाईक, माजी जिप अध्यक्ष संजय पडते, जिप सदस्य दादा साईल, नगरसेवक अभि गावडे, माजी बांधकाम सभापती बाळ महाभोज, मालवण पंचायत समिती सदस्य सौ. रिया बावकर, आमडोस माजी सरपंच दिलीप परब, तंटा मुक्ती अध्यक्ष विष्णू परब, निवृत्ती परब व अन्य उपस्थित होते.
▪️अमित खोत, मालवण

