क्रिकेट स्पर्धेला शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी आपली उपस्थिती दर्शविली
या स्पर्धेत महाराष्ट्रासह मुंबई स्थित नामवंत खेळाडूंचा सहभाग लाभला
शानु वालावलकर | मालवण :- राजकोट बॉईज क्रिकेट संघ आणि राजकोट मित्र मंडळ आयोजित प्रकाश झोतातील खुली अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेला शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी राजकोट बॉईज क्रिकेट संघ आणि राजकोट मित्र मंडळाच्या वतीने शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांचा सत्कार करण्यात आला.

बॉक्स क्रिकेटची चॅम्पियन ट्रॉफी अशी या स्पर्धेची ओळखली जाणारी राजकोट बॉईज आणि राजकोट मित्र मंडळ आयोजित भव्य दिव्य नाईट अंडरार्म क्रिकेट स्पर्धा ही स्पर्धा दिनांक ७ ते 11 या कालावधीत सहदेव शेठ बापर्डेकर आणि सोनू खांदारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या क्रिकेट स्पर्धेला शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी आपली उपस्थिती दर्शविली होती.

यावेळी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, नगरसेवक महेश कांदळगांवकर,नगरसेवक ललित चव्हाण, नगरसेवक सिद्धार्थ जाधव, नगरसेवक महेश कोयंडे, नगरसेविका मेघा सावंत, नगरसेविका पूनम चव्हाण, भाग्यश्री लुडबे, अश्विनी कांदळकर, राजू बिडये, सुनील खांदारे, संतोष खांदारे, नंदू देसाई, संजय नार्वेकर, गौरी खांदारे, गीता बापर्डेकर, सुचिता खांदारे, साधना मोरवेकर, गौरी दुधवडकर, निशिगंधा मंडलिक, श्रावणी कामत, संगीता जोशी, प्रतिभा नार्वेकर यांसह अन्य सदस्य उपस्थित होते.

या स्पर्धेत महाराष्ट्रासह मुंबई स्थित नामवंत खेळाडूंचा सहभाग लाभला आणि प्रथमच मालवण मध्ये बॉक्स क्रिकेटमध्ये मालिकाविर साठी दुचाकी पारितोषिक ठेवण्यात आले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेता संघ सोहम तेजस स्पोर्ट्स कुडाळ ठरला. व द्वितीय क्रमांकआदिनारायण परूळे ठरला. तसेच राहुल काळप हा सिंधुदुर्गातील अष्टपैलू खेळाडू मालिकावीर ठरला आणि त्याला बक्षीस स्वरूपात टू व्हीलर देण्यात आली. विजेत्या संघाचा संघमालक महेश आळवे याला बक्षीस स्वरूपात ए.सी. देण्यात आला.


