शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांची प्रमुख उपस्थिती
शानु वालावलकर | मालवण : वायरी गावाचा विकास करण्यासाठी सर्वांनी एकोप्याने काम करणे गरजेचे आहे. विकासाची कास धरल्यास वायरी गावचा गतिमान विकास होणार आहे. वायरी गावातील विविध विकास कामे खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात युती सरकारच्या माध्यमातून पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही प्रयत्नाशील आहोत. असे प्रतिपादन शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी दिले.

खासदार नारायण राणे यांच्या खासदार निधीतून वायरी भूतनाथ येथील उभाटवाडी स्मशानभूमी बांधकामाचा शुभारंभ शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, उपसभापती शाम झाड, शिवसेना तालुका प्रमुख मंदार लुडबे, वायरी सरपंच भगवान लुडबे, उपसरपंच माणगावकर, भाजपा उपतालुकाध्यक्ष केदार झाड, नगरसेवक विकी तोरसकर, शाखा प्रमुख संदेश तळगांवकर, देवानंद लोकेगावकर, भालचंद्र केळुसकर, दाजी सावजी, पांडुरंग मायानक, संदीप बडवे, दादा झाड, यशवंत गांवकर, भाई मांजरेकर यांसह अन्य उपस्थित होते.
▪️अमित खोत | मालवण

