Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

ओझर विद्यामंदिरच्या माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र कदम यांची निवड !

ओझर विद्यामंदिरच्या माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र कदम यांची निवड !

मालवण | प्रतिनिधी :- मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेच्या माजी विद्यार्थी संघाची नुकतीच स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन परिपत्रकातील निर्देशानुसार संघाच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. ओझर विद्यामंदिरमध्ये नवीनच स्थापन केलेल्या माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी ओझर विद्यामंदिरचे माजी विद्यार्थी व अलीकडेच जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, बांधकाम विभाग, सिंधुदुर्ग या विभागातून प्रमुख आरेखक या पदावरून नुकतेच सेवानिवृत्त झालेले राजेंद्र हरी कदम यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली. 'ओझर विद्यामंदिरच्या विकासासाठी मी पूर्णवेळ काम करण्यासाठी कटिबद्ध आहे' असे नूतन अध्यक्ष राजेंद्र हरी कदम यांनी आपल्या मनोगतनातून सांगितले. संघाची इतर कार्यकारिणी पुढील प्रमाणे- उपाध्यक्ष -उमेश दिनकर कोदे, सचिव - डी. डी. जाधव (प्रभारी मुख्याध्यापक), कोषाध्यक्ष- पांडुरंग कृष्णा राणे, सदस्य- रोहन दीपक कदम, विशाल सत्यवान राणे, चंद्रशेखर रमेश कांबळी, मधुसूदन दत्तात्रय परुळेकर, सल्लागार- विद्याधर धोंडू कदम, विजय भालचंद्र नातू, राकेश मोहन कदम यांची निवड करण्यात आली.

ओझर विद्यामंदिरच्या माजी विद्यार्थी संघ निवडीनंतर नूतन कार्यकारिणीने ओझर विद्यामंदिरची विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी कार्यवाही करणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व विविध क्षमतांच्या प्रगतीसाठी व्याख्याने व कौशल्यांवर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे, माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करणे आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची उपलब्धता करून देणे इत्यादी उपक्रमांची तातडीने कार्यवाही करण्याचे ठरविले. या सभेसाठी मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समितीचे विश्वस्त नंदकुमार राणे, माजी विद्यार्थी तथा शालेय समितीचे अध्यक्ष किशोर नरे, माजी विद्यार्थी रविराज जाधव, शिक्षक शिवराम सावंत उपस्थित होते. या सभेप्रसंगी सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये ओझर विद्यामंदिरची कांस्यपदक विजेती हर्षिका राकेश कदम तसेच यशस्वी विद्यार्थी स्मृती उदय परब व योगेश यशवंत आयकर यांचा अध्यक्ष राजेंद्र कदम, संस्था संचालक नंदकुमार राणे व शालेय समितीचे अध्यक्ष किशोर नरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शेवटी पांडुरंग कृष्णा राणे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

rapan bottom