उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, नगरसेविका नीना मुंबरकर यांचा यशस्वी पाठपुरावा
मालवण | प्रतिनिधी : विजेची समस्या सोडवण्याच्या दृष्टीने आडारी मेन रोड ते बाबू बगाड यांच्या घरापर्यंत थ्री फेज लाईन टाकण्यात आली आहे. उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, स्थानिक नगरसेविका नीना मुंबरकर यांच्या यशस्वी पाठपुराव्यातून हे काम मार्गी लावण्यात आले आहे.

यावेळी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, स्थानिक नगरसेविका निना मुंबरकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, नगरसेवक महेश कांदळगावकर, नगरसेवक ललित चव्हाण, राजू वीर,अर्जुन चव्हाण, विनायक खानोलकर, माणगांवकर, बाबू बगाड, शामा आजगावकर यांसह नागरिक उपस्थित होते.
स्थानिक स्तरावरील वीज समस्या मांडल्या नंतर तातडीने त्याची दखल घेत ती सोडवल्या बद्दल वीज वितरणचे अधिकारी श्री. शेकाण, श्री. म्हेत्रे, श्री. मयेकर तसेच वायरमन श्री. मेस्त्री व ठेकेदार शिरोडकर यांचे नगरसेविका नीना मुंबरकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर यांनी आभार मानले आहेत.
मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली कटीबद्ध असल्याचे उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, नगरसेविका नीना मुंबरकर यांनी सांगितले.
▪️अमित खोत | मालवण

