Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

मालवण रोझरी इंग्लिश स्कूल येथील आरोग्य शिबिरास उत्तम प्रतिसाद

मालवण रोझरी इंग्लिश स्कूल येथील आरोग्य शिबिरास उत्तम प्रतिसाद

जागतिक महिला दिना निमित्त रक्तदान,रक्त तपासणी व नेत्र तपासणी शिबिर संपन्न

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सिंधुदुर्ग रुग्णालय आणि रोझरी चर्च मालवण यांचे आयोजन

मालवण | प्रतिनिधी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सिंधुदुर्ग आणि रोझरी चर्च मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने रोझरी इंग्लिश स्कूल, मालवण येथे रक्तदान, रक्त तपासणी व नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले. या शिबिरास उत्तम प्रतिसाद लाभून ३० जणांनी रक्तदान केले तर ४० जणांची रक्त तपासणी व २५ जणांची नेत्र तपासणी करण्यात आली.

हे शिबीर मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष सिंधुदुर्गचे समाजसेवा अधीक्षक सुनील कुंडगिर, समाजसेवा अधीक्षक नितीन तुरनर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी नितीन तुरनर यांनी मानवी जीवनामध्ये स्त्रीचे असणारे अनन्यसाधारण महत्व अधोरेखित करत नवनिर्मितीची प्रचंड ऊर्जा असणाऱ्या स्त्रिया आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बराबरीनेच नव्हे तर किंबहुना एक पाऊल पुढे टाकत आपला ठसा उमटवत आहेत, असे सांगितले. तर सुनील कुंडगिर यांनी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारावर उपचार करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते, असे सांगत आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अशा विविध योजनांची माहिती देत गरजूनी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

या शिबिरासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती ठोंबरे, नर्सिंग ऑफिसर सुमंगल बुगडे, रक्तपेढी तंत्रज्ञ प्रांजली पावसकर, रक्तपेढी सहाय्यक ऋतुजा हरमलकर, परिचर नितेश पाटील व प्रथमेश घाडी, वाहन चालक नितीन गावकर यांचे सहकार्य लाभले. यावेळी नगरसेविका अनिता गिरकर, फादर ऑलविन गोन्साल्वीस, जेम्स फर्नांडिस, मॅक्सि रेस, लिवो मेंडीस, अंतोन फर्नांडिस, आगोस्तिन डिसोजा आदी व इतर उपस्थित होते.

rapan bottom