Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

पराड प्राथमिक शाळेचा शतक महोत्सव उत्साहात संपन्न

पराड प्राथमिक शाळेचा शतक महोत्सव उत्साहात संपन्न

विविध शैक्षणिक, सांस्कृतिक- आरोग्य उपक्रमांचे आयोजन

शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती

शानु वालावलकर | मालवण:
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पराड या प्रशालेचा शतक महोत्सवी वर्ष सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यास शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी उपस्थित राहत शुभेच्छा दिल्या.

मालवण तालुक्यातील पराड या गावातील जिल्हा प्राथमिक शाळेला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ८ मार्च ते १० मार्च विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. यात ८ मार्च जागतिक महिला दिना निमित्त महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ पैठणी चा व फनी गेम्स कार्यक्रम संपन्न झाले.तर सोमवार दि ९ मार्च रोजी ज्ञानज्योती आदिवासी व मागासवर्गीय शिक्षण संस्था ठाणे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमा प्रसंगी माजी शिक्षक यांचा सत्कार सोहळा , आजी माजी विद्यार्थी मेळावा, विद्यार्थ्यांचे संस्कृतीक कार्यक्रम,संपन्न झाले. मंगळवार दि.१० मार्च रोजी शतक महोत्सव सोहळ्या निमित्त स्मरणिका प्रकाशन सोहळा, प्रशालेच्या १०० वा वाढ दिवस केक कापून साजरा करण्यात आला. या शाळेसाठी १०० वर्षा पूर्वी ज्या शेख कुटुंबीयांनी जागा दिली त्या कुटुंबियांचे वारस यांचा सत्कार करण्यात आला.तर नाम फलक शीलालेखाचे फित कापून उदघाटन करण्यात आले.

यावेळी प्रशालेसाठी श्रमदान केलेल्या ग्रामस्थाचा व जेष्ठ नागरिक यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.पराड प्रशालेचा शतक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमा प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, माजी बांधकाम सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य संतोष साटविलकर,माजी अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य सुमेधा पाताडे, पंचायत समिती सदस्य रिया बावकर, शिक्षण अधिकारी सिंधुदुर्ग,जयप्रकाश परब, गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, गटशिक्षणाधिकारी संजय माने, केंद्र प्रमुख आंबेरी, नंदकिशोर गोसावी, सरपंच ग्रा.प.पेंडूर खरारे नेहा परब, विषयतज्ज्ञ समग्र शिक्षा अभियान गौरी नार्वेकर, पराड पोलीस पाटील विश्वास मालवणकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सई धुरी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सिंधुदुर्ग चे डॉ. शरयू सावंत, डॉ.कपिल दानी, डॉ रक्षा तवरावाल,डॉ.सौरव रंजित, डॉ.शाहीन अमीर, डॉ.नागेश पवार,डॉ. संजय पोळ,पोलीस निरीक्षक आरिफा मुल्ला , पोलीस उप निरीक्षक प्रतिज्ञा खोत, आरती कांबळी, रुपाली प्रभू, महेंद्र जाधव, शुभदा सापळे,शतक महोत्सव समिती अध्यक्ष प्रदीप आवळेगांवकर, मुख्याध्यापक कृष्णा कालकुंद्रीकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिपलक्ष्मी पराडकर, शिक्षक शितल पाटील, शिवसेना उप तालुका प्रमुख आतिक शेख , रमाकांत आवळेगांवकर, सलीम शेख, शाळा व्यास्थापन समिती, शतक महोत्सव समिती, मुंबई ग्रामस्थ पदाधिकारी, आजी माजी विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्ये ने या शकत महोत्सव सोहळ्यास उपस्थित होते.

rapan bottom