जागतिक महिला दिना निमित्त कोळंब ग्रामपंचायतच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम.
मालवण | प्रतिनिधी : कोळंब ग्रामपंचायत च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित पाककला स्पर्धेत नंदा बावकर तर खेळ पैठणी चा स्पर्धेत जान्हवी कांदळगांवकर यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
जिल्हा महिला व बाल कल्याण विकास विभाग अंतर्गत महिला समुपदेशन केंद्र पोलीस स्टेशन आवार कुडाळ व सखी वन्स स्टॉप सेंटर सिंधुदुर्ग आणि ग्रामपंचायत कोळंब यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिना निमित्त कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालय येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


यात आयोजित तृणधान्य पासुन पाककला स्पर्धेत द्वितीय अश्विनी कुर्ले, तृतीय निकिता बागवे, यांनी क्रमांक पटकाविले. खेळ पैठणी चा व संगीत खुर्ची सर्धेत: द्वितीय नंदा बावकर,बादलीत बॉल टाकणे : तनया तुषार साळकर, संपदा समीर प्रभू, ग्लास बॉल नेम : अनिता अनिल न्हीवेकर, रुजूला राजेंद्र प्रभूगावकर,मेणबत्ती पेटवणे : जान्हवी जनार्दन बांदेकर, तनुजा गुरुप्रसाद चव्हाण लकी ड्रॉ विजेते: अर्चना आत्माराम ढोलम, अंजली मेथर, पूजा धुरी,रेखा ढोलम, संजना माळकर, यांनी यश मिळविले.


या स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, जिल्हा परिषद सदस्या क्षमा संदीप हडकर,पंचायत समिती सदस्या योजना जयराम कांबळी, ग्रामपंचायत कोळंब सरपंच सौ. सिया रामचंद्र धुरी व उपसरपंच विजय भिवा नेमळेकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.




यावेळी ग्रामपंचायत सदस्य सौ.निकिता बागवे,सौ .नंदा बापू बावकर, सौ. संपदा समीर प्रभू,उज्वला चंद्रकांत करलकर ,सौ.संजना संदीप शेलटकर, श्री. विशाल गुणाजी फणसेकर, श्री.स्वप्निल सखाराम परब , श्री.मंगेश मधुकर चव्हाण ग्रामपंचायत अधिकारी महेंद्र देवेंद्र मोरे,समुपदेशक महेंद्र जाधव, समुपदेशक रूपाली प्रभू,समुपदेशक,जान्हवी केळुसकर, वन्स स्टॉप सेंटर सिंधुदुर्ग केस वर्क मीनाक्षी नाईक, निकिता पाटकर आदी उपस्थित होते. पाककला स्पर्धेचे परीक्षण मंडळ अधिकारी मिलन चव्हाण यांनी केलं.



