Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

घरगुती एलपीजी गॅसचा अवैध वापर व काळाबाजार रोखण्यासाठी तालुकास्तरीय भरारी दक्षता पथके स्थापन

घरगुती एलपीजी गॅसचा अवैध वापर व काळाबाजार रोखण्यासाठी तालुकास्तरीय भरारी दक्षता पथके स्थापन


सिंधुदुर्ग : आखाती देशातील युद्ध परिस्थिती विचारात घेता घरगुती एलपीजी गॅसचा अवैध वापर तसेच गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात तालुकास्तरीय भरारी दक्षता पथकांचा स्थापना आदेश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या स्वाक्षरीने निर्गमित झाला आहे. संबंधित तालुक्याचे तहसीलदार हे पथकप्रमुख असणार आहेत.

घरगुती एलपीजी गॅस वापराबाबत केंद्र शासनाच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय तसेच PPAC, PNGRB आणि PESO आणि राज्य शासनाचे आदेश, नियम व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक आहे. सध्या जागतिक परिस्थितीचा विचार करता इंधनाबाबत तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिस्थितीमध्ये गॅस इंधनाचे दर वाढण्याची,  घरगुती गॅसचा अवैध वापर, काळाबाजार ( Black Marketing) होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  या परिस्थितीमध्ये घरगुती गॅसचे वितरण सुरळीत व सुरक्षित होण्यासाठी नियंत्रणात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. त्यानुसार घरगुती गॅसचा अवैध वापर तथा काळाबाजार रोखण्याकरिता गॅस एजन्सीच्या तथा तत्संबंधी प्राप्त तक्रारीनुसार तपासणी करण्यासाठी  प्रत्येक तालुक्यात भरारी दक्षता पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे. संबंधित तालुक्याचे तहसीलदार हे पथकप्रमुख असणार आहेत.
या पथकांमार्फत घरगुती एलपीजी गॅसचे सुरक्षित वितरण होत आहे का याची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच गॅसचा अवैध वापर, काळाबाजार रोखणे, गॅस वाहतूक गाडी अडविणे आणि प्राप्त तक्रारींची चौकशी करणे अशी जबाबदारी पथकावर सोपविण्यात आली आहे.

तपासणीदरम्यान गैरप्रकार आढळून आल्यास 'जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५', 'लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस ऑर्डर २०००' तसेच 'भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२१ व १२६ नुसार संबंधितांवर आपल्यास्तरावर कारवाई करावी  तसेच केलेल्या तपासण्या व कारवाईचा अहवाल दररोज जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याच्या सूचनाही आदेशात देण्यात आलेल्या आहेत.

rapan bottom